पर्यटन अस्थापनांमध्ये आतषबाजीला बंदी
९ फेब्रुवारी २०२६
दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संपूर्ण दक्षिण गोवा जिल्ह्यात नाईट क्लब, बार आणि रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि रिसॉर्ट्स, बीच शॅक आणि तात्पुरत्या बांधकाम आणि कार्यक्रम स्थळी आणि मनोरंजन अस्थापनासह पर्यटन अस्थापनामध्ये फटाके, स्पार्कलर, पायरोटेक्निक उपकरणे, ज्वाला थ्रोअर प्रकारची उपकरणे, धूर जनरेटर आणि तत्सम अग्नि धूर निर्माण करणारी उपकरणे वापरण्यास, पेटविण्यास किंवा चालवण्यास बंदी लागू केली आहे.
ही बंदी सर्व आयोजक, कार्यक्रम व्यवस्थापक, व्यक्ती आणि संस्था, नाईट क्लब, बार आणि रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि रिसॉर्ट्स, बीच शॅक आणि तात्पुरत्या बांधकाम आणि कार्यक्रम स्थळे आणि मनोरंजन अस्थापनांना लागू आहे.
ही बंदी मंदिरे, चर्च, मशिदी, गुरुद्वारा आणि तत्सम मान्यताप्राप्त प्रार्थनास्थळे यासारख्या धार्मिक स्थळांना लागू होणार नाही, जिथे पारंपारिक रोषणाई किंवा धार्मिक विधी पारंपारिक नियमांनुसार केले जातात.
अपवादात्मक प्रकरणांमध्ये, जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा अधिकृत अधिकारी आतिशबाजीसाठी पूर्व लेखी परवानगी देऊ शकतात परंतु त्यासाठी अर्जदाराने तपशीलवार सुरक्षा आणि जोखीम कमी करण्याची सुरक्षा उपाय हाती घेण्याची खात्री दिली पाहिजे.
हा आदेश ९ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल आणि तो आधी मागे घेतल्याशिवाय ६० दिवसांच्या कालावधीसाठी (दोन्ही दिवसांसह) लागू राहील.
उपजिल्हाधिकारी आणि संबंधित पोलिस यंत्रणा या बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करतील आणि आदेशाचे उल्लघन करणाऱ्यावर कारवाई करतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/११८

