नोबेल विजेते शास्त्रज्ञ प्राध्यापक वेंकी रामकृष्णन यांचे व्याख्यान
१३ जानेवारी २०२६
गोवा सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाने १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता दोना पॉवला येथील सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था येथे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते आणि जगातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रज्ञांपैकी एक असलेले प्रो. वेंकी रामकृष्णन यांचे सार्वजनिक व्याख्यान आयोजित केले आहे. जागतिक प्रसिध्दीच्या शास्त्रज्ञांना ऐकण्याची गोव्यातील लोकांना ही दुर्मिळ संधी आहे. जीवन, दीर्घायुष्य आणि मानवी अस्तित्वाच्या मर्यादांबद्दलच्या सर्वात मोठ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या व्याख्यानातून मिळेल. “आपण का मरतो?” याचा उलगडा ते करतील.
रसायन शास्त्रातील कार्याबद्दल प्रो. वेंकी रामकृष्णन यांना २००९ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या शोधांमुळे आण्विक पातळीवर जीवन कसे चालते हे त्यांच्या संशोधनातून दिसून आले आणि वैध्यकिय प्रगतीस खास करून एन्टिबायोटिक्स आणि जनेटिक नियमन समजण्यास मार्ग मिळाला.
हे व्याख्यान तज्ञ, संशोधक, शिक्षक, विध्यार्थी आणि लोकांसाठी महत्वाचे आहे. खास करून विध्यार्थ्यांना नोबल विजेत्याकडून प्रेरणा घेण्यास आणि संवाद साधण्याची संधी मिळेल. व्याख्यानाला उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्यांनी संचालनालयाच्या https://dhe.goa.gov.in/ या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या QR कोडचा वापर करून आगाऊ नोंदणी करण्याची विनंती केली जाते.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/३३

