Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

तुयें येथे सरकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन “सार्वजनिक सेवा हे आमचे मार्गदर्शक तत्व आणि आरोग्य सेवा मजबूत करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री डॉ. सावंत

२ फेब्रुवारी २०२६

तुयें येथे उत्तर गोव्यातील पेडणे तालुका आणि सभोवतालच्या भागातील रहिवाशांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करणारे सरकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे (जीएमसी लिंक) उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होईल.

.स्थानिक लोकसंख्येसाठी आवश्यक वैद्यकीय सेवा करण्यासाठी उपलब्ध डॉक्टरांची नियुक्ती करून हे रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत ऑपरेशन थिएटर सेवा आणि अतिरिक्त सुविधा सुरू होण्याची अपेक्षा आहे. हे केंद्र भविष्यातील आरोग्यसेवा आणि शैक्षणिक उपक्रमांनाही सहकार्य देईल, ज्यामुळे परिसरातील वैद्यकीय सेवांच्या दीर्घकालीन विकासात योगदान मिळेल.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनकारी कार्याबद्दल आरोग्यमंत्री श्री विश्वजित राणे यांचे कौतुक केले आणि सार्वजनिक सेवा हे आमचे मार्गदर्शक तत्व आहे आणि आरोग्यसेवा मजबूत करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे असे सांगितले. ते पुढे म्हणाले सरकारने राज्यभर व्यापक आरोग्यसेवा विकास हाती घेतला आहे आणि तरुण गोव्यातील डॉक्टरांनी गोव्यातील लोकांची, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यासाठी पुढे यावे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विकास उपक्रमांकडे सकारात्मक दृष्टिकोनाची गरज प्रतिपादली आणि सरकार लोकांच्या कल्याणावर आणि गोव्याच्या एकूण प्रगतीवर लक्ष केंद्रित करून स्पष्ट दृष्टिकोन ठेवून काम करते असे ते म्हणाले.

.उद्घाटनाला आरोग्य, महिला आणि बालविकास आणि नगर नियोजन मंत्री श्री विश्वजित राणे, पेडणेचे आमदार आणि जीएचआरएसएसआयडीसीचे अध्यक्ष श्री प्रविण आर्लेकर, माद्रेचे आमदार श्री जित आरोलकर, माजी मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर, तुयेंच्या सरपंच श्रीमती अनिता साळगावकर, जिल्हा परिषद सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९१

Skip to content