तानावडे यांची लाल किल्ल्यावर भारत पर्वला भेट
२९ जानेवारी २०२६
राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे यांनी नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित भारत पर्व उत्सवाला भेट दिली. त्यांनी गोवा पर्यटन खात्याच्या दालनास भेय दिली आणि राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पर्यटन साधनसुविधा आणि ऐतिहासिक वारशावरील प्रदर्शनाची पाहणी केली.
पर्यटन खात्याचे श्री. बिब्वा गावकर, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संयुक्त संचालक श्री. पंकज मराठे आणि सहाय्यक माहिती अधिकारी श्री. श्याम गावकर यांनी श्री. तानावडे यांचे स्वागत केले.
श्री तानावडे यांनी गोव्यातील लोक कलाकारांनी सादर केलेल्या लोकनृत्य सादरीकरणाचा आनंद घेतला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून कलाकारांची प्रशंसा केली.
खासदारांनी गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने सादर केलेल्या गोव्याच्या चित्ररथालाही भेट दिली. “स्वातंत्रता का अमृत महोत्सव – वंदे मातरम” या संकल्पनेवर आधारित या चित्ररथात गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीचा वारसा दाखविण्यात आला.
भारत पर्व २०२६ मध्ये भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे आणि एकतेच्या भावनेचे प्रतिबिंब असलेले गोव्यातील कलाकार आणि उत्तराखंडमधील कलाकारांचे रंगमंच सादरीकरणाची त्यांनी पाहणी केली.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/७७

