Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

जॅकीस यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती

९ डिसेंबर २०२५

नवी दिल्लीतील भारतीय निवडणूक आयोगाने महसूल सचिव श्री. संदिप जॅकीस आयएएस यांची गोवा राज्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. १ जानेवारी २०२६ ही पात्रता तारीख म्हणून सध्याच्या मतदार यादीची विशेष सारांश पुनरावृत्ती चालू आहे.

मतदार यादी निरीक्षक सर्वसामान्य लोकांचे कोणतेही दावे/प्रस्न असल्यास ते स्वीकारण्यासाठी १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषदगृहात उपलब्ध असेल. तसेच सर्वसामान्य लोक चेंबर क्रमांक १०२, दुसरा मजला, सचिवालय, पर्वरी, बार्देश-गोवा, ४०३५२१ येथे त्यांच्या कार्यालयांत संपर्क साधू शकतात किंवा त्यांच्याशी फोन क्रं. ०८३२-२४१९४११, २४१९६२० वर संपर्क करू शकतात.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८४१

Skip to content