चाईल्ड हेल्पलाईन क्र. १०९८ शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्याचे निर्देश
१७ मार्च २०२६
गोवा राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये आणि सीर्वजनिक ठिकाणी ‘चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८’ प्रदर्शित करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ‘लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण’ (पॉस्को) कायद्याखाली येणाऱ्या घटनांची दखल घेऊन संबंधित संस्था, यंत्रणांना आवश्यक उपाय हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.
