गोव्याच्या मांड संस्कृतीचे जतन करण्यासाठी मांड पथकांची नोंदणी
११ फेब्रुवारी २०२६
गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाने गोव्याच्या मांड संस्कृतीचे पुर्नजीवन, जतन आणि संरक्षणासाठी सरकारी योजना या योजनेखाली राज्यातील मांड पथकांची नोंदणी करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. गोव्याच्या पारंपारिक मांड पथकांची प्रमाणबद्द नोंदणी करून गोव्याच्या पुरातन सांस्कृतिक वारश्याचे जतन करण्यास आदार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मांड परांपरा ही गोव्यातील अनेक गांव आणि समाजाच्या संस्कृतीचा भाग आहे आणि ही परंपरा मंदिरे, गावातील मैदान आणि समाजाच्या इतर ठिकाणी सादर करण्यात येते. लोककला, संगीत, विधी प्रकार आणि सादरीकरणातून अनेक पिढ्यांपासून ही परंपरा चालू आहे. या परंपरेचे जतन होण्यासाठी सरकारने मांड पथकांची नोदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मांड गुरू, मांडेली, पथक सदस्य आणि प्रशिक्षणार्थी, मांड परंपरेची विशेष कला सादरीकरण आणि समाजात चालू असलेल्या वारसा इतिहास अशा माहितीची सविस्तर नोंद होईल. अर्जासोबत परंपरा आमि समाज आधारित मांड पद्दतीच्या प्रकाराची माहिती आणि ज्येष्ठ कलाकार किंवा समाजातील वयस्कर व्यक्तीची मान्यता असावी.
सरकारने मांड संस्कृतीवर स्थापन केलेली समिती अर्जांची छाननी करणार आणि योजनेच्या नियमांप्रमाणे अर्जांची पात्रता ठरवतील. या योजनेखाली पारंपारिक वाध्यांची देखबाल, दुरूस्ती, नवीन लोकवाद्यांची खरेदी, मांड दुरूस्ती आणि देखबाल, मांडागुरू आणि विध्यार्थ्यांना प्रशिक्षण अशा कारणांसाठी आर्थिक मदत देण्यात येईल. अशी आर्थिक मदत फक्त देवस्थान समिती, गांव समिती, मान्यता असलेले गांव, मांड पथक किंवा संस्थेच्या नावाने असलेल्या बॅंक खात्यात जमा करणार.
विहीत नमुन्यातील अर्ज १० फेब्रुवारी २०२६ पासून कला व संस्कृती संचालनालयात उपलब्ध असेल. इच्छुक मांड पथकांनी पूर्ण भरलेले आपले अर्ज २० फेब्रुवारीपर्यंत कला आणि संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन, पाटो पणजी येथे सादर करावे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१२६

