गोवा सरकार माहिती आणि प्रसिद्धी खाते पणजी – गोवा पेट्रोल आणि डिझेलच्या पुरेशा साठ्याबाबत सूचना
२६ मार्च २०२६
राज्यातील तेल टर्मिनलवर पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून, राज्यभरात पुरवठ्यात कोणताही व्यत्यय आलेला नाही. आरओ, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्याची गरज नाही आणि पुरवठा पूर्वीप्रमाणेच कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहील. त्यामुळे
सर्वसामान्य लोकांनी पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करून अनावश्यक भीती आणि चिंता निर्माण करणे टाळावे असे नागरी पुरवठा खात्याने कळविले आहे.
मा/वाप/दिबा/ एपी/ र ना/२०२६/१३५२
