गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची पुर्नस्थापना
३१ मार्च २०२६
सरकारने गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची पुर्नस्थापना केली आहे. श्री शशीकांत पुनाजी हे आयोगाचे अध्यक्ष तर स्नेहल साळगांवकर,संजीवनी देसाई, शलाका देसाई, एस्टर रॉय तोरीस, सोफिया डिसोझा हे आयोगाचे सदस्य आहेत.
राज्यात बाल हक्क संरक्षण, मुलांसाठी सुरक्षित वातावरण आणि बाल कल्याणासाठी आयोग कार्यरत असून बाल हक्क संरक्षण आणि बाल हक्क कायद्याविषयी समाजात जागृती निर्माण करणे आणि बाल हक्क कायद्याच्या उल्लंघनाच्या तक्रारींची चौकशी आणि कारवाई करण्याचे कार्य आयोग करते. बाल हक्क संरक्षण कायद्याच्या उल्लंघना विषयी कोणतीही तक३र असल्यास लोकांनी गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, डी-७-ए, तळमजला, सरकारी क्वाटर्स, अग्नी सेवा संचालनालयासमोर, सांतिनेज पणजी- (ईमेल आयडी- sect-scpcr.goa@nic.in) फोन क्र.७०३०९४१३३० यावर संपर्क साधावा.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२१७
