गोवा नशा मुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थांचे सेवन दूर करण्याच्या राष्ट्रीय अभियानात सामील “२०४७ पर्यंत विकसित भारतासाठी, नशामुक्त राष्ट्र निर्माण करा- डॉ. प्रमोद सावंत
२७ फेब्रुवारी २०२६
बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे नशा मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेचा उद्देश जागरूकता निर्माण करणे, मादक पदार्थांचे सेवन रोखणे आणि मादक पदार्थांचे व्यसन दूर करण्यासाठी समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे असा आहे.
१५ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रीय स्तरावर सुरू झालेला हा उपक्रम आता मोठ्या प्रमाणात सार्वजनिक चळवळीत रूपांतरित झाला आहे, ज्यामुळे देशभरातील कोट्यवधी नागरिकांना, ज्यात तरुण आणि महिलांचा समावेश आहे. गोव्यात, जागरूकता मोहीम, शालेय पोहोच कार्यक्रम, प्रहारी क्लब आणि कायदा अंमलबजावणी संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाज संघटनांचा समावेश असलेल्या समन्वित प्रयत्नांद्वारे ही मोहीम राबविली जात आहे. राज्य आणि देशाबाहेरून येणाऱ्या अंमली पदार्थांच्या ओघाला आळा घालण्यासाठी अधिकारी देखरेख आणि अंमलबजावणी अधिक तीव्र करीत आहेत, अलिकडच्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात जप्ती झाल्याची नोंद झाली आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न म्हणजे नशामुक्त भारत असाही असावा असे सांगितले.” या मोहिमेत युवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे यावर त्यांनी भर दिला आणि प्रत्येक व्यक्तीला अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी नागरिकांना समुपदेशन आणि पुनर्वसन प्रयत्नांना सहकार्य देण्याचे, असुरक्षित व्यक्तींना बरे होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आणि बेकायदेशीर कृत्ये नोंदविण्यात अधिकाऱ्यांना सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यसनमुक्तीचा मार्ग निवडणाऱ्यांचे आणि त्यांच्या धाडसाचे आणि दृढनिश्चयाचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, समाज कल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई, श्री ब्रह्मानंद शंखवाळकर, श्री सुशांत पंत, श्रीमती प्रतिमा गुप्ता, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१४९
