गोवा कोंकणी अकादमीच्यावतीने राजभाषा दिनानिमित्ताने राज्य पातळीवर कार्यक्रम, राजभाषा, तरुण आणि गोंव्याचे भविष्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.
३ फेब्रुवारी २०२६
गोवा सरकारची गोवा कोंकणी अकादमी ४ फेब्रुवारी हा दिवसदरवर्षी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात आणि या दिनानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. यावर्षी ३९ व्या कोंकणी राजभाषा दिनामित्ताने राज्य पातळीवर राजभाषा, तरुण आणि गोव्याचे भविष्य या विषयावर व्याख्याने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अकादमीच्या शणै गोंयबाब सभागृहात ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता खास कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे अध्यक्ष फा. मौजीञ आताईद उपस्थित राहतील. तसेच राजभाषा संचालनालयाचे उप-संचालक श्री. अनील सावंत सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच राजभाषा, तरुण आणि गोंव्याचे भविष्य या विषयावर डॉ. हनुमंत चोपडेकर यांचे खास व्याख्यान असेल. याशिवाय अकादमीच्या वेगेवेगळ्या योजनेखाली ५ पुस्तकांचें प्रकाशन होईल. त्यात सुनील पालकार यांचे उदेंत, सुशांत लक्ष्मीकांत नायक यांचे होम मिनिस्टर, सम्राट बोरकार यांचे आय लव्ह यू,एन्थनी मिनेझीस यांचे हांव घोवाची बायल, अरूण आबा नायक यांचे म्हज्यो गोंयच्यो यादी तसेच श्रीमती माया खरंगटे यांचे ‘कसवटणी’ हे कथासंग्रह या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
या कार्यक्रमात कोंकणी विशयांत बी.ए आणि एम.ए. पातळीवर अधिक गूण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अकादमीच्या कोंकणी शैक्षणिक शिश्यवृत्ती योजनेखाली शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल. तसेच राजभाषा दिनाची व्याख्याने राज्य पातळीवर खाली दिलेल्या महाविद्यालयांमध्ये आयोजित केली जाईल. मुरगांव आणि सासस्टी तालुका मडगांव पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय, डॉ. जयंती नायक यांचे व्याख्यान आणि प्रमुख पाहुणे ऍड. उदय भेंब्रें असतील. डिचोली आणि सत्तरी तालुका सरकारी महाविद्यालय, सांखळी. श्री अनिल वेर्णेंकर यांचे व्याख्यान आणि श्री झिलू गांवकार हे प्रमुख पाहुणे असतील. म्हापसा,तिसवाडी आणि पेडणें तालुका सारस्वत महाविद्यालय, म्हापसा. श्री शशिकांत पूनाजी यांचे व्याख्यान आणि प्रमुख पाहुणे श्री रमेश घाडी, उपाध्यक्ष गोंवा कोंकणी अकादेमी, पणजी असतील. सांगें, काणकोण आणि केंपे तालुका सरकारी महाविद्यालय, केपें. श्री दिनेश मणेरकार यांचे व्याख्यान आणि प्रमुख पाहुणे श्री कमलाकार म्हाळशी असतील. धारबादोडा आणि फोंडा तालुका पी. ई. एस. महाविद्यालय, फोंडा. श्री एन. शिवदास यांचे व्याख्यान आणि श्री रामनाथ गावडे हे प्रमुख पाहुणे असतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९६

