गतिरोधक उभारण्याचे आदेश
१ जानेवारी २०२६
उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका आदेशाव्दारे पणजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नोसा सेन्होरा डे रेमिडियोस चॅपेलजवळील जंक्शनच्या ३० मीटर आधी आणि पोस्ट ऑफिसजवळील जंक्शनच्या १० मीटर आधी गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचप्रमाणे, रायबंदर ते पणजी जाणाऱ्या रस्त्यावर तांबा घराजवळील ‘वाय’ जंक्शनच्या ३० मीटर आधी आणि चॅपेलपासून १५ मीटर अंतरावर गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/८७२

