गतिरोधक उभारण्याचे आदेश
१ डिसेंबर २०२५
दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी बायणा ते वास्को रेल्वे ओव्हर ब्रिजकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर आनंद इमारतीजवळ जोड रस्त्यापासून सुमारे १५ मीटर अंतरावर एक आणि सडा ते बोगदा बाजुने जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर बोगडेश्वर मंदिर जंक्शनजवळ जोड रस्त्यापासून सुमारे १५ मीटर अंतरावर हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्याचा आदेश दिला आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८२९

