कारकाने आणि बाष्पक खात्याच्या सुरक्षा आणि आरोग्य अभ्यासक्रमाचे उदघाटन
१२ नोव्हेंबर २०२५
कारखाने आणि बाष्पक निरीक्षकांलयाने आयोजित केलेल्या धोकादायक प्रक्रिया उद्योगांमध्ये काम करणाऱ्या पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा आणि आरोग्य या विषयावरील चार आठवड्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आल्तिन पणजी येथे खात्याच्या सभागृहात उद्घाटन झाले.
कारखाने आणि बाष्पकचे मुख्य निरीक्षक श्री अनंत एस. पांगम यांनी अभ्यासक्रमाचे महत्व सांगून कारखाने कायदा, १९४८ च्या कलम ४१क अंतर्गत तरतुदीप्रमाणे धोकादायक प्रक्रिया उद्योगांमध्ये काम करणाऱ्या पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा आणि आरोग्य संबंधित उपाय करणे आणि प्रशिक्षित पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे ही प्रत्येक उध्योगांची जबाबदारी असल्याचे सांगितले.
उध्योगांसाठी प्रशिक्षित पर्यवेक्षक कर्मचाऱी उपलबध करण्यासाठी अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात येते. क्युरेटर श्री संजय वेळीप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कारखाने निरीक्षक आणि अभ्यासक्रम समन्वयक श्री प्रेमानंद व्ही. गावडे यांनी आभार मानले.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८१३

