Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

आरटीआय पोर्टलच्या अकार्यक्षमतेवरील वृत्तासंदर्भात माहिती खात्याकडून खुलासा

२१ जानेवारी २०२६

कांही स्थानिक दैनिकांमध्ये माहिती खात्याने अंमलात आणलेले आरटीआय पोर्टल अकार्यक्षम आणि सदर खात्याला या विषयी माहिती नाही अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द झाले आहे. त्यासंदर्भात माहिती खात्यातर्फे असा खुलासा करण्यात येतो की प्रकाशित झालेले वृत्त खोटे आणि दिशाभूल करणारे आहे.

आपल्या खुलाशात ( rtionline.goa.gov.in ) हे पोर्टल योग्यरित्या कार्यरत आहे असे खात्याने स्पष्ट केले आहे. हे पोर्टल राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राद्वारे डिझाइन केले आहे आणि त्यांच्याकडून देखभालही केली जाते. नागरिकांना आरटीआय अर्ज दाखल करणे, अपील करणे आणि आरटीआय शुल्क ऑनलाइन भरणे सुलभ करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

माहिती अधिकार कायदा, २००५ च्या उद्दिष्टांनुसार, सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्यासाठी हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे. हे पोर्टल सुरू झाल्यापासून, २,६३४ आरटीआय अर्ज, ४२४ पहिले अपील आणि ३४ दुसरे अपील पोर्टलवर दाखल झाले आहेत. खात्याने २० जानेवारी २०२६ पर्यंतच्या नोंदींमध्ये पोर्टलला १७० ऑनलाइन आरटीआय अर्ज आणि २० पहिले अपील प्राप्त झाले आहेत. अशा प्रकारे स्थानिक दैनिकाचे वृत्त दिशाभूल करणारे आणि खोटे आहे.

जर कोणत्याही अर्जदाराला अर्ज दाखल करताना समस्या येत असतील तर ते आवश्यक मदतीसाठी खात्याशी संपर्क साधू शकतात किंवा मार्गदर्शनासाठी हेल्पलाइन ईमेलवर पाठवू शकतात. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/४५

Skip to content