अर्थपूर्ण राष्ट्रीय विकासासाठी आवश्यक सामूहिक प्रयत्न करावे—श्री शिरोडकर गोवा एक आदर्श राज्य बनविण्याचे तरुणांना आवाहन
२६ जानेवारी २०२६
जलस्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांनी शहीद स्मारकावर पुष्पांजली वाहिली आणि भारताच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी आपले बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. फोंडा येथील क्रांती मैदानावर आयोजित ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात त्यांनी राष्ट्रध्वज फडकविला. नंतर मानवंदना दिली आणि संचलनाची पाहणी केली.
यावेळी बोलताना श्री शिरोडकर यांनी मुलांमध्ये आणि भावी पिढ्यांमध्ये देशभक्ती रुजविण्याचे महत्त्व प्रतिपादले. त्यांनी भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि शिक्षण, शेती, उद्योग आणि तंत्रज्ञानात देशाची सतत प्रगती यावर प्रकाश टाकला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात स्वावलंबी आणि समावेशक विकासाला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध विकास उपक्रमांबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाला फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. वीरेंद्र ढवळीकर, स्वातंत्र्यसैनिक, माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर, माजी आमदार आमशेकर, संचालक श्री. रमेश नाईक, रजिस्ट्रार श्री. आशुतोष आपटे, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य, उपजिल्हाधिकारी श्री. कौशिक, मामलेदार, उपअधीक्षक श्री. एस. वायंगणकर, पीआय श्री. व्ही. कवळेकर, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/

