Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड चांचणी

१० जानेवारी २०२६

केंद्रीय नागरी सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ गोवा सरकारच्या सहकार्याने १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत म्हापसा येथील भाऊसाहेब बांदोडकर क्रीडा संकूल पेडे येथे अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे.

.क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय १४ आणि १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता एसएजी इनडोअर, हॉल कांपाल, पणजी येथे बॅडमिंटनसाठी गोवा राज्य नागरी सेवा बॅडमिंटन संघ निवडण्यासाठी निवड चाचणी घेईल.

सरकारी खात्यांमध्ये नियमित कर्मचारी असलेले इच्छुक खेळाडूनी विभागप्रमुखांनी स्वाक्षरी केलेले ओळखपत्र आणि कार्यक्रमस्थळी योग्य किटसह श्री प्रकाश सतरकर – ९८२३२६९०८८ (योजना प्रभारी) यांच्याशी संपर्क साधावा.

अखिल भारतीय नागरी सेवांनुसार ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर्स, युनिफॉर्म्ड कर्मचारी संरक्षण सेवा, पॅरा मिलिटरी, पोलिस, आरएफएस, सीआयएसएफ, आयटीबीपी, राष्ट्रीय शालेय खेळ, एसपीजी आणि नियमित आस्थापन सेवेत ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधी असलेले नवीन भरती झालेले सरकारी कर्मचारी निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र नाहीत.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/२३

Skip to content