लोकोत्सव २०२६ महोत्सवासाठी स्वयंसेवक नियुक्तीसाठी अर्ज
९ जानेवारी २०२६
कला आणि संस्कृती संचालनालयाने पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त सहकार्याने दर्या संगम, कला अकादमी, कांपाल येथे २० ते २९ जानेवारी पर्यंत लोकोत्सव आयोजित केला आहे. लोकोत्सव काळात म्हणजे १९ ते २९ जानेवारी २०२६ पर्यंत लोकोत्सवाच्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून सेवा देण्यास इच्छुक पणजी शहर आणि सभोवतालच्या भागातील महाविद्यालयांचे विद्यार्थ्यीं, समाज कार्य करणाऱ्या स्थानिक निम सरकारी सस्थांचे प्रतिनिधी उमेदवार, २० ते ३५ वयोगटातील युवकांकडून कला आणि संस्कृती संचालनालयाने अर्ज मागविले आहेत. सेवा काळासाठी सर्व स्वयंसेवकांना विद्यावेतन दिले जाईल. स्वयंसेवकांना संध्या ३.०० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत सेवा द्यावी लागेल.
अर्ज कोऱ्या कागदावर आधार कार्डाच्या प्रतिसह १४ जानेवारी २०२६ पर्यंत कला आणि संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन, पाटो-पणजी येथे सादर केला पाहिजे. प्रथम येणाऱ्यास प्रथम याप्रमाणे अर्जाचा विचार केला जाईल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/२०

