- गोवा कोरोना मुक्त करा- मुख्यमंत्री February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
नोवेल कोविड-१९ महामारीमुळे आम्ही खूप त्रास सहन केला पण आता कोविड १९ विषाणूपासून मुक्ती मिळविण्यासाठी लस मिळविण्यात आपण यशस्वी झालो आहोत असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ही लस घेऊन गोवा कोरोनामुक्त करावा असे आवाहन त्यांनी लोकांना केले. आत्मनिर्भर भारत आणि लसीकरण मोहिमेत भागीदारी केल्याबद्दल त्यांनी रिजनल आऊटरीच ब्युरो यांची ...
- वीज पुरवठा खंडीत February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
११ केव्ही औद्योगिक फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बेतोडा औद्योगिक वसाहत परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे, ११ केव्ही बोंडला फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत गांजे, भिंडीमळ, आंबेशी, बोंडलालँड-II, गावकरवाडा, आणि ...
- गोवा स्वयंपूर्ण करण्यात यशस्वी होण्यासाठी १० कलमी मुद्दे – मुख्यमंत्री February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व नगरपालिकांसाठीच्या स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचा मागोवा घेतला.
गोवा स्वयंपूर्ण करण्यात यशस्वी होण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम आखावा असे मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकार्यांना सांगितले. सर्वांसाठी निवारा या उद्दीष्टा अंतर्गत झोपडपट्टी भागाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खर्या गरजवंत लोकांपर्यंत केंद्रीय किंवा राज्याच्या योजना पोहोचतात की नाही हे ...
- वीज तारांबाबत इशारा February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
वागातोर हणजूण येथील सर्वे क्र. २१४/२ मधील मे. मेफेअर रिसॉर्ट इंडिया लिमिटेड चे संचालक (गोकुल कुमार) यांना तात्पुरते कनेक्शन देण्यासाठी उभारलेल्या नवीन १०० केव्हीए प्लींथ माऊंटेड जीटीसी वाहिनी दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी विद्युतभारित करण्यात येणार असून त्यानंतरही ती भारित राहील. लोकांनी वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे, त्यांना स्पर्श करू नये अन्यथा ...
- वीज पुरवठा खंडीत February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
११ केव्ही म्हार्दोळ, ११ केव्ही कुंडई, ११ केव्ही मार्शेल, ११ केव्ही औद्योगिक I, II आणि III आणि ३३/११ केव्ही कुंडई सब स्टेशन फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी ६.०० वाजेपर्यंत कुंडई औद्योगिक वसाहत, तिवरे वरगाव पंचायत क्षेत्र, भोम अडकोण, बेतकी खांडोळा पंचायत, वेलिंग प्रियोळ ...
- शिवोली सडये येथे गतिरोधक February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकार्यांतर्फे, शिवोली सडये येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गतिरोधक उभारण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा गतीरोधक म्हापश्याकडे जाणार्या रस्त्यावर साकवापासून १७ मिटर अंतरावर उभारण्यात येणार आहे असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.
मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१७०
- फर्मागुडी फोंडा येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे फर्मागुडी, फोंडा येथे दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार्या राज्यपातळीवरील कार्यक्रमात गोव्याच्या जनतेच्या वतीने महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण करतील.
हा कार्यक्रम माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे बांदोडा ग्रामपंचायत आणि कवळे जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्याप्रमाणे कला व संस्कृती ...
- मुख्यमंत्र्यांची सीआरईडीएआय, जीएसआयए, लघु हॉटेल मालक संघटनांशी अर्थसंकल्पपूर्व बैठक February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
क्रेदाई (सीआरईडीएआय), गोवा राज्य उद्योग संघटना (जीएसआयए) आणि लघु हॉटेल मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी गुरूवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आगामी राज्य अर्थसंकल्पात विचारात घेण्यासाठी त्यांच्या मागण्या सुपूर्द केल्या.
मुख्यमंत्र्यांनी शांतपणे या तिन्ही संघटनांचे प्रश्न ऐकून घेतले आणि आगामी अर्थसंकल्पात ते विचारात घेण्याचे त्यांना आश्वासन दिले.
तिन्ही संघटनांच्या कर ते व्यवसाय करण्यामध्ये ...
- मुल्यांकन शिबिर पुढे ढकलले February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
समाज कल्याण संचालनालयाचे १५ फेब्रुवारी २०२१ ते ४ मार्च २०२१ दरम्यान होणारे शिबिर पुढे ढकलण्यात आले असून ते एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत घेण्यात येईल. पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येणार आहे.
असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.
मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१६७
- वीज पुरवठा खंडीत February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
११ केव्ही होंडा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आयटीआय, गावकरवाडा, वडादेवनगर, होंडा, होंडा मार्केट (काणे) आणि कदंबा बसस्टँड डीटीसी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे, ११ केव्ही होंडा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.३० ते ...