Home »News


     गोवा सरकार

       माहिती आणि प्रसिध्दी खाते

     पणजी - गोवा

                         सरकारी वार्तापत्र

 

सागर डिस्कोर्सच्या समारोप सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती

 

       दि. २६ ऑक्टोबर २०१८

          कार्तिक ४,१९४०

 

          फिन्स या संस्थेतर्फे बांबोळी येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या             ‘सागर डिस्कोर्स’च्या समारोप सोहळ्याला राज्यपाल श्रीमती (डॉ.) मृदुला सिन्हा यांची उपस्थिती होती. 

          यावेळी त्या म्हणाल्या, राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत अंतराळ विषयावरील चर्चा जबाबदारपणे करण्याचे ध्येय सागर डिस्कोर्सने ठेवले होते. आधुनिक जगासाठी तसेच मानवाच्या भविष्यासाठी बाह्य अंतरिक्ष महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्या पुढे म्हणाल्या, प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत सूर्य व चंद्राची पूजा केली जात असल्याने आम्ही सूर्य, चंद्र व अंतरिक्षाशी खूप जवळून जोडलेले आहोत.

          यावेळी बोलताना गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वरूण साहनी म्हणाले, स्पेस डेब्रिस हे भारतासाठी मोठे आव्हान आहे.

          कॅप्टन श्री. अजय लेले म्हणाले, जगातील बहुतांश प्रतिनिधींनी परिषदेला उपस्थिती लावली. अंतराळाशी निगडीत विविध विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. श्री. लेले पुढे म्हणाले, अंतराळाचे भविष्य हे सरकारच्या हाती नाही, पण काही धोरणात्मक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

          फिन्स फोरमचे सरचिटणीस डॉ. शेषाद्रि च्यारी यांचेही यावेळी भाषण झाले. लेफ्टनंट जनरल व्ही.एम. पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती. फिन्सचे उपाध्यक्ष जस्टीस आर. एम. खांडेपारकर यांनी आभार मानले.  

         

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/अगां/२०१८/१७३०

TOP