Home »News

उपराष्ट्रपतींच्या हस्ते सागर डिस्कोर्सचे उद्घाटन

 

दि. २४ ऑक्टोबर २०१८

       कार्तिक २,१९४०

 

                 भारताचे उपराष्ट्रपती श्री. एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षितता आणि विविध देशांमधील अवकाश भागीदारी यावर आधारित तीन दिवशीय   ‘सागर डिस्कोर्स’ या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. बांबोळी येथील हॉटेलमध्ये तीन दिवस चालणार्‍या या परिषदेत अंतराळ सुरक्षिततेचा जगातील भुगर्भीय संस्थांवर होणार्‍या परिणामांवर चर्चा करण्यात येणार आहे. इस्रो, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय याच्या सहकार्याने काम करणार्‍या मुंबई येथील फिन्स या संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा ‘सागर डिस्कोर्स’ हा वार्षिक उपक्रम आहे.

          राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा, पंचायत मंत्री श्री. माविन गुदिन्हो, फिन्सचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल डी.बी. शेकटकर, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. किरण कुमार, परिषदेचे निमंत्रक डॉ. पालेरी आणि ड. बाळ देसाई यावेळी उपस्थित होते.

          आपल्या बीजभाषणात उपराष्ट्रपती म्हणाले, सागर यासारख्या परिषदेतून विशिष्ट क्षेत्रातील आव्हाने व संधी समजून घेण्यास मदत होते. अशा प्रकारच्या परिषदांमध्ये तज्ज्ञाकडून मिळालेल्या ज्ञानाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. अंतराळ आणि जलसुरक्षितता या क्षेत्रांमध्ये अधिक काम झाले पाहिजे आणि अशा विषयांवरील चर्चा आपल्या ज्ञानात भर टाकेल असे ते म्हणाले.

          भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सौर उर्जा व इतर नैसर्गिक उर्जा स्रोतांचा वापर केला पाहिजे. दारिद्र्य, बदलणारे हवामान आणि बालमजुरी या भारतातील काही आव्हानांवर आपण विचार करणे गरजेचे आहे असे श्री. नायडू म्हणाले.

या परिषदेसाठी गोव्याची निवड केल्याने राज्यपालांनी फिन्स सदस्यांचे अभिनंदन केले.

दीप प्रज्वलनाने सोहळ्याचे उद्घाटन झाले. लेफ्टनंट जनरल शेकटकर यांनी स्वागत केले.       डॉ. किरण कुमार व डॉ. पालेरी यांचीही यावेळी भाषणे झाली. श्री. गोखले यांनी सूत्रसंचालन केले तर ड. देसाई यांनी आभार मानले.

          केंद्रीय आयुष मंत्री श्री. श्रीपाद नाईक, खासदार श्री. विनय तेंडुलकर, माजी मंत्री      श्री. राजेंद्र आर्लेकर यावेळी उपस्थित होते. या तीन दिवशीय परिषदेला २०पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी, माजी सैनिक, संरक्षण अधिकारी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहतील.

 

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/अगां/२०१८/१७१७

TOP