Home »News

२० व्या पाळीव जनावरांच्या जनगणनेला १ ऑक्टोबर पासून प्रारंभ

 

दि.२७ सप्टेंबर २०१८

                                                                 आश्विन ०५,१९४०

 

२०व्या पाळीव जनावर जनगणनेचे प्रत्यक्ष काम १ऑक्टोबर २०१८ पासून जगभरात प्रारंभ होणार आहे. गोव्यात जनगणनेचे काम १ऑक्टोबर पासून पूर्ण क्षमतेने सुरू होईल. या काळात गणक प्रत्येक घरी जाऊन जनावरांची संख्या, त्यांची जात आणि स्वभाव, कुक्कूटपालन आणि मत्स्यपालनाविषयीच्या माहितीची नोंद करतील.

पशुसंवर्धन आणि पशुचिकीत्सा खाते, पशुसंवर्धन भवन, यांनी नियुक्त कलेले गणक दिवसाला कोणत्याही वेळी घरी भेट देऊ शकतात. त्यामुळे त्यांना पूर्ण सहकार्य द्या आणि जनावरांविषयी योग्य माहिती द्या.

ज्याच्यामुळे देशाच्या जीडीपी मध्ये वाढ होईल अशा पशूधन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी तयार करण्यात येणारे कोणतेही कार्यक्रम किंवा योजना कार्यान्वित करण्यासाठी लागणार्‍या योग्य नियोजनासाठी आवश्यक माहितीचा मुख्य स्त्रोत असलेल्या पशुधनाच्या संख्येची गणना तयार करण्यासाठी मिळवलेली सर्व माहिती संकलित केली जाईल.

 

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१६०१

 

TOP