Home »News

गोवा राज्य जैवविविधता मंडळाची उत्कृष्ठ कामगिरी

 

दि.२७ सप्टेंबर २०१८

                                                                 आश्विन ०५,१९४०

 

 मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील गोवा राज्य जैवविविधता मंडळाने उत्कृष्ठ कामगीरी बजावली आहे.

          ग्रामपंचायत पातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करणारे गोवा हे देशातील दुसरे राज्य आहे. जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी मंडळाने महत्वपूर्ण करार केले आहेत. त्याचप्रमाणे तज्ञांकडून आवश्यक तो सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यात येते तसेच बैठकांचे नियमित आयोजन करण्यात येते.

मंडळाने कल्परस उत्पादन म्हणजेच शहाळ्याच्या पाण्यासाठी मे. कृष्णा प्लांटेशन प्रा. लि., नानू हाऊस, मडगांव, मधाच्या उत्पादनासाठी तानशीकर स्पाईस फार्म नेत्रावळी सांगे, मध मेणाच्या उत्पादनासाठी मे. रायका न्ड कंपनीला मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे उत्पादनावर प्रदर्शित करण्यासाठी जैवविविधता निशाण देणारे गोवा राज्य जैवविविधता मंडळ हे प्रथम राज्य मंडळ आहे. जैविक साधनांचे जतन आणि वापर करण्यास मंडळाच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येते.

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१६००

TOP