Home »News

२७ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतींचे गोव्यात आगमन

दि.२६ सप्टेंबर २०१८

आश्विन ०४,१९४०

 

भारताचे उपराष्ट्रपती श्री. व्यंकय्या नायडू हे २७ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता रांची विमानतळावरून खास विमानाने गोव्यात येत आहेत. श्री. नायडू दाबोळी विमानतळावरून रात्री ८.२५ वाजता दोनापावल येथील राजभवनाकडे रवाना होतील आणि राजभवनात त्यांचे रात्री वास्तव्य असेल.

        २८ सप्टेंबर रोजी श्री. नायडू सकाळी ९.३० वाजता राजभवन आवारात रोपटे लावतील आणि त्यानंतर सकाळी १० वाजता कला अकादमीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदविदान सोहळ्यास उपस्थित राहतील. तद्नंतर सकाळी ११.४० वाजता ते एमआरके प्रसाद यांच्या निवासस्थानी जातील. त्यांच्या निवासस्थानातून दुपारी २.४० वाजता ते निघतील.

         उपराष्ट्रपती मुंबई विमानतळावर प्रस्थान करण्यासाठी दुपारी ३.०५ वाजता गोवा विमानतळावर रवाना होतील.

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५९५

TOP