Home »News

     २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत भारतीय फॉरेन्सिक दंतशास्त्र संघटनेची परिषद

                                                                                     

 

दि.२६ सप्टेंबर २०१८

आश्विन ०४,१९४०

 

          २८ ते ३० सप्टेंबर पर्यंत भारतीय फॉरेन्सिक दंतशास्त्र संघटनेची आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषद इंटरनॅशनल फॉरेन्सिक ऑडोंटो-स्टोमेटोलॉजी संघटनेबरोबर संपन्न होणार आहे. फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजीची डिजीटल युगाकडे वाटचाल अशी या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत सुमारे ४५० राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

          ही परिषद तीन दिवस चालणार असून पहिल्या दिवशी पूर्व परिषद वर्ग घेण्यात येईल तर दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी पाहूणे व्याख्यान आणि शास्त्रीय सत्र घेण्यात येईल. दंतशास्त्र चिकित्सक, पोलीस अधिकारी आणि न्याय संस्थेच्या सदस्यांना प्रवक्ते, पॅनॉलिस्ट आणि प्रतिनिधी म्हणून आमंत्रित केले आहे

          यावेळी ईटली येथील फ्लोरेन्स विद्यापिठाच्या प्राध्यापक विल्मा पिंची, मलेशिया येथील एमएएचएसए विद्यापिठाचे प्राध्यापक डॉ. प्रभाकरन नांबियार, हाँगकाँग येथील बालरोगतज्ञ डॉ. जयकुमार जयरामन, नेपाळ याथील त्रिभूवन विद्यपिठाच्या प्राध्यापक डॉ. समारिका दहाल, पुणे विद्यापिठाचे प्राध्यापक जी. व्ही भानू, गोवा दंत महाविद्यलयाचे माजी प्राध्यापक डॉ. अजित दिनकर,ऑस्ट्रेलिया प्रशिक्षित डॉ. आशित बी. आचार्य अशा आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय प्रवक्त्यांची व्याख्याने होतील.

          २९ आणि ३० सप्टेंबर रोजी  विज्ञान सत्रात विद्यार्थी प्रतिनिधी पेपर्स आणि पोस्टर्स सादर करतील. गोवा पर्यटन आणि कला व संस्कृती संचालनालयाने हा कार्यक्रम पुरस्कृत केला आहे.

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५९४

TOP