Home »News

प्रयोग सांज मध्ये दि. २९ सप्टेंबर रोजी काळोख चे सादरीकरण

                                                                         दि.२६ सप्टेंबर २०१८

आश्विन ०४,१९४०

 

कला आणि संस्कृती संचालनालयामध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रंगमंच उपक्रमांतर्गत प्रयोग सांज या उपक्रमाचे आयोजन केले जाते. पाटो पणजी येथील संस्कृती भवनाच्या बहूउद्देशीय सभागृहात २९ सप्टेंबर रोजी संध्या. ६.३० वाजता प्रयोग सांज मध्ये होणारा हा प्रयोग या उपक्रमातील ६४ वे सादरीकरण असेल.

 या प्रयोगसांज मध्ये काळोख या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येईल. हे नाटक प्रख्यात लेखक स्व. श्री. विजय तेंडूलकर यांच्या लेखणीतून उतरले असून त्याचे दिग्दर्शन श्री. वर्धन कामत आणि श्री. सुशांत नाईक यांनी केले आहे. यात श्री. वर्धन कामत आणि सौ. अनुजा पुरोहित यांच्या प्रमुख भूमिका असून श्री. मंदार केळकर यांनी या नाटकाचे संगीत संयोजन केले आहे. श्री. श्रीनिवास उसगांवकर यांची प्रकाशयोजना, श्री. सौमित्र बखले यांची नेपथ्य व्यवस्था आणि श्रीमती सुविधा तोरगळ बखले यांची वेशभूषा असेल. नव्या मंडळांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि होतकरू कलाकारांना नाटक क्षेत्राकडे वळविणे हे  प्रयोग सांज चे मुख्य उद्दीष्ट आहे. मे २०१८ मध्ये या उपक्रमाने यशस्विरीत्या ५ वर्षे पूर्ण केली आहेत. कला आणि संस्कृती खाते या नाटकांच्या सादरीकरणासाठी बहूउद्देशीय सभागृह विनामुल्य उपलब्ध करून देते.  या प्रयोगसांजमध्ये प्रयोग सादर करण्यासाठी इच्छुक मंडळांनी कला आणि संस्कृती खात्याकडे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहील आणि सर्व कलाकारांनी आणि नाट्यप्रेमींनी या प्रयोगाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५९३

 

TOP