Home »News


मिलिंद नाईक आणि निलेश काब्राल यांना मंत्रीपदाची शपथ

दि.२४ सप्टेंबर २०१८
आश्विन ०२,१९४०

आज राजभवनवर दरबार सभागृहात झालेल्या एका साध्या सोहळ्यात आमदार श्री. मिलिंद नाईक आणि श्री. निलेश काब्राल यांचा मंत्री म्हणून शपथग्रहण सोहळा पार पडला. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी दोन्ही मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सुरूवातीला मुख्य सचिव श्री. धर्मेंद्र शर्मा यांनी नेमणूकीचा आदेश वाचला. श्री. नाईक यांनी मराठीतून तर श्री. काब्राल यांनी कोकणीतून शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर, नगरनियोजन मंत्री श्री. विजय सरदेसाई, पर्यटनमंत्री श्री. मनोहर आजगांवकर, महसूल मंत्री श्री. रोहन खंवटे, कला आणि संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, जलस्त्रोत मंत्री श्री. विनोद पालयेकर, गृहनिर्माण मंत्री श्री जयेश साळगांवकर, पंचायत मंत्री श्री. माविन गुदीन्हो, आरोग्य मंत्री श्री. विश्वजित राणे, गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत, खासदार श्री. नरेंद्र सावईकर, श्री. विनय तेंडूलकर, आमदार श्री. राजेश पाटणेकर, श्री ग्लेन टिकलो, श्रीमती अलीना साल्ढाणा, श्री. दिपक पाऊसकर, माजी मुख्यमंत्री श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी सभापती श्री. राजेंद्र आर्लेकर, गोवा व महाराष्ट्र आयोजन सचिव(भाजप)श्री. विजय पुराणिक, भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि गोवा विभागाचे प्रभारी श्री. बी. एल. संतोष, माजी आमदार श्री. कुंकळकर, माजी उप-सभापती श्री. अनंत शेट, भाजपचे वरीष्ट पुढारी आणि दोन्ही मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५७९

 

TOP