Home »News

बेटी बचाओ बेटी पढाओ विषयावर स्पर्धा

दि.२४ सप्टेंबर २०१८
आश्विन ०२,१९४०

लिंगभेदाच्या बाबतीतील वेगवेगळे विषय अधोरेखीत करण्यासाठी दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी साजरा होणार्याव आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाचे संस्मरण करण्यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाच्या राज्य कुटुंब नियोजन मंडळाने उत्तर आणि दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालयांतर्फे "बेटी बटाओ बेटी पढाओ" या विषयावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचार्यांहसाठी पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात ६ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ९.३० वाजता समुह लघुनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सादरीकरणासाठी ८ ते १० मिनिटांचा अवधी देण्यात येईल आणि जास्तीत जास्त ८ ते १० कलाकारांना यात भाग घेता येईल. नो फायर कुकींग स्पर्धाः यामध्ये २ पुरूष स्पर्धकांना भाग घेता येईल. निबंध लेखन स्पर्धेसाठी "माझी मुलगी- माझा अभिमान" हा विषय असून तो ए- 4 आकाराच्या पेपरवर सादर करावा. यासाठी कमाल २०० शब्दसंख्या असावी व तो दि. २६ सप्टेंबर पर्यंत सुपूर्द करावा लागेल.
उच्चमाध्यमिक/महाविद्यालय/आयटीआय च्या विद्यार्थ्यांसाठी दि. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा घेण्यात येणार आहे. पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहामध्ये सकाळी ९.३० वाजता समूह लघुनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही लघुनाट्य स्पर्धा तालुका पातळीवर निवड झालेल्या बारा संघांमध्ये होणार आहे. सादरीकरणासाठी ८ ते १० मिनिटांचा अवधी देण्यात येईल आणि जास्तीत जास्त ८ ते १२ कलाकारांना यात भाग घेता येईल.
२१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०१८ या काळात उच्चमाध्यमिक/महाविद्यालय/
आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी नागरी आरोग्य केंद्र/कम्युनिटी आरोग्य केंद्र /प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत खालील ठिकाणी तालुका निहाय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कम्युनिटी आरोग्य केंद्र, पेडणे, नागरी आरोग्य केंद्र, म्हापसा बार्देश, प्राथमिक आरोग्य केंद्र, डिचोली, कम्युनिटी आरोग्य केंद्र, वाळपई, सत्तरी, नागरी आरोग्य केंद्र, पणजी, नागरी आरोग्य केंद्र, मुरगांव,वास्को, प्राथमिक आरोग्य केंद्र, फोंडा, प्राथमिक आरोग्य केंद्र, धारबांदोडा, प्राथमिक आरोग्य केंद्र सांगे, कम्युनिटी आरोग्य केंद्र, काणकोण, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाळ्ळी केपें, नागरी आरोग्य केंद्र, मडगांव, साष्टी या ठिकाणी संपन्न होणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या स्पर्धक संघाला दि. ५ ऑक्टोबर रोजी होणार्याध राज्यस्तरीय पातळीवराल स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात येईल.
विद्यार्थ्यांसाठी लघुनाट्य स्पर्धा दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत तर सरकारी कर्मचार्यां साठी ६ ऑक्टोबर रोजी स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेचे बक्षिस वितरण दि ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिनी पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहामध्ये होणार्याऑ राज्यपातळीवरील कार्यक्रमामध्ये होणार आहे.
या स्पर्धेच्या प्रवेशिका दि. २७ सप्टेंबर २०१८ पर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात सुपूर्द कराव्या, किंवा photobbbp@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्या. अधिक माहितीसाठी ९८८१५११५४४ /९९२३४८५७०६ या क्रमांकावर संपर्क साधावा, www.nhm.goa.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी.

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५७६

 

 

TOP