Home »News

मुली या खास असतात- राज्यपाल

पणजी, १९ सप्टेंबर, २०१८
भाद्रपद २८, १९४०

"मुली या खास असतात,निसर्गाने त्यांना खास बनविले आहे" असे प्रतिपादन डॉ. (श्रीमती) मृदुला सिन्हा यांनी केले. वुमन इन एवियेशन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टर आणि लॉकहिड मार्टीन इंडिया या संस्थेने पणजी येथे आज आयोजीत केलेल्या ‘गर्ल्स इन एवियेशन डे' कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलताना केले. "कुटुंबाचे पालन करण्यासाठी आणि समाज तसेच देशासाठी योगदान देण्यासाठी महिलांकडे विशेष क्षमता असते", असेही राज्यपालांनी सांगितले.
"आज महिलांसाठी आकाश ठेंगणे बनले आहे आणि महिला वेगवेगळ्या क्षेत्रांत भरारी घेत आहेत", असे सांगताना, राज्यपालांनी शिक्षण, आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे यावर भर दिला.
वुमन इन एवियेशन इंटरनॅशनल (डब्ल्यूएआय) ही वैमानीक क्षेत्रात करियरमध्ये प्रोत्साहन देणारी आणि त्यांच्या आवडीनुसार काम करायला संधी देणारी बिगर नफा तत्वावर चालणारी संस्था आहे
यावेळी वुमन इन एवियेशन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षा श्रीमती राधा भाटिया, लॉकहिड मार्टीन इंडियाचे मुख्य कार्यकारी फिल शॉ आणि एपीडी गोवा विमानतळाचे श्री. बीसीएच नेगी उपस्थित होते.

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/रापे/२०१८/१५६८

 

 

TOP