Home »News

आरोग्य संचालनालयातर्फे २० सप्टेंबर रोजी "चेंजींग डायबेटीस बॅरोमीटर" कार्यक्रम

दि.१९ सप्टेंबर २०१८
भाद्रपद २८,१९४०

राष्ट्रीय नॉन कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाने नोवो नॉरडिस्क एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि २० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता पणजी येथील कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर प्रेक्षागृहात "चेंजींग डायबेटीस बॅरोमीटर" कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री श्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, जोपर्यंत आपण मधूमेहाविषयी आणि त्याच्या वाईट परिणामांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पावले उचलत नाही आणि योग्य उपचाराचा अंगीकार करीत नाही तोपर्यंत ते समाजातील व्यक्ती, त्यांचे कुटुंब आणि एकूणच समाजासाठी एक आव्हान ठरणार आहे. मधूमेह शोधून काढणे, त्याचे लवकर निदान, आणि व्यवस्थापन करून तो आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी करून संयुक्त तत्वावर या रोगावर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे. सीबीडी कार्यक्रमामुळे दर्जेदार सुविधेद्वारा मधूमेही लोकांना सुधारित उपचार मिळण्याची आम्ही खात्री देऊ शकतो अशी आशा त्यांनी या वेळी प्रकट केली.
या कार्यक्रमा अंतर्गत पहिल्या स्तरावर मधूमेह तपासणी आणि उपचारासाठी पाच सामुदायिक मधूमेह केंद्रे उघडली जातील. ती म्हणजे गोवा वैद्यकीय महाविद्यालाय, उत्तर गोवा हॉस्पिटल, दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटल, उप-जिल्हा हॉस्पिटल फोंडा, आणि कुटीर हॉस्पिटल चिखली. सद्या सगळ्या सरकारी हॉस्पिटलांमध्ये मोफत इन्सुलिन दिले जाते. मधूमेह उपचाराच्या नव्या प्रगतीवर सगळ्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाईल. घराघरांमध्ये जाऊन समुपदेशन आणि मार्गदर्शन देण्यासाठी मधूमेह एज्युकेटर्सची नेमणूक केली जाईल. मधूमेह तपासणी तसेच मधूमेहासंबंधी शिक्षण, आयईसी सामग्री देण्यासाठी एएनएम कर्मचार्यां ना प्रशिक्षण दिले जाईल.
आरोग्य सेवा संचालनालय आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालाया अंतर्गत शोधून काढलेल्या आरोग्य केंद्रांनी देण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा डायबेटीक मेलीटस रूग्णांनी परिणामकारक व्यवस्थापन आणि रोग निदानासाठी लाभ घ्यावा अशा विनंती करण्यात आली आहे.

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/रापे/२०१८/१५६७

 

 

TOP