Home »News

झुवारी पूल ३० सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी बंद

दि.१९ सप्टेंबर २०१८
भाद्रपद २८,१९४०

सर्व जनतेला कळविण्यात येत आहे की, झुवारी पूलावर डेक लेवल तपासणी करायची असल्याने दि. ३० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ६.०० ते ९.०० वाजेपर्यंत झुवारी पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या वेळेत सर्व प्रकारची वाहतूक एनएच 17 वरील बोरी पूल आणि तसेच जुवारी नदीतून फेरीबोट मार्गे कुठ्ठाळी ते आगशी आणि परत अशी वळवली जाईल.
मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/रापे/२०१८/१५६५

 

 

 

 

 

TOP