Home »News

चोपडे येथे गतिरोधक उभारण्याचे आदेश
दि.१९ सप्टेंबर २०१८
भाद्रपद २८,१९४०

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पेडणे तालुक्यातील चोपडे सर्कल जवळ एमडी आर-१९ आणि एमडी आर-५३ रस्त्यांवर दोन गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत. एक गतिरोधक पेडणे तालुक्यातील मांद्रे एमडीआर-१९ कडे जाणार्यार रस्त्यावर चोपडे सर्कल पासून २० मीटर अंतरावर आणि दुसरा गतिरोधक आगरवाड चोपडे पंचायत क्षेत्रात मोरजीकडे जाणार्याु एमडी आर-५३ रस्त्यावर चोपडे सर्कल पासून २० मीटर अंतरावर उभारण्यात येईल.
मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/रापे/२०१८/१५६४

 

 

 

TOP