Home »News


ऑक्टोबर महिन्याचा रेशन कोटा

दि.१९ सप्टेंबर २०१८
भाद्रपद २८,१९४०

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत रेशन कोटा ठरविला आहे. अंत्योदय अन्न योजना कार्ड धारकांना प्रति कार्ड ३ रूपये प्रति किलो या दराने ३५ किलो तांदूळ आणि रू. १३.५० प्रति किलो दराने १ किलो साखर देण्यात येईल. अन्नपूर्णा कार्ड धारकांना प्रति कार्ड १० किलो तांदूळ (विनामूल्य) मिळेल. वेल्फेअर इन्स्टिट्यूशन योजना कार्डधारकांना रू. ६.१५ दराने तांदूळ आणि रू. ४.८० दराने गहू दिले जातील. त्याचप्रमाणे, प्रायोरीटी हाऊजहोल्ड कार्डधारकांना प्रति कार्ड रू. ३ या दराने ५ किलो तांदूळ, दारिद्र्य रेषेवरील कार्डधारकांना प्रति कार्ड रू. ११.६० या दराने ७ किलो तांदूळ आणि रू. ९.१० या दराने ५ किलो गहू दिले जातील.

कोटा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले असून प्राप्त झालेला कोटा २८ सप्टेंबर २०१८ या दिवशी किंवा त्या पूर्वी उचलावा असे सर्व स्वस्त धान्य दुकानांना कळविण्यात येत आहे. यासाठी कोणतीही मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचे सूचित करण्यात येत आहे. स्वस्त धान्याच्या दुकानांनी आपल्या धान्यसाठ्याचा तपशील त्याचबरोबर धान्याचा गुणवत्ता नमुना ग्राहकाच्या माहितीसाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. रेशन कार्ड धारकांनी ऑक्टोबर २०१८ चा त्यांच्या वाट्याचा रेशन कोटा आपल्या स्वस्त धान्याच्या दुकानामधून घ्यावा.
कसलीही तक्रार असल्यास, संबंधित कार्डधारकांनी/ग्राहकांनी तालुक्यातील संबंधित मामलेदाराकडे किंवा नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खाते, जुन्ता हाऊस, पणजी येथे आपली तक्रार द्यावी अशी सूचना करण्यात येत आहे.

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/रापे/२०१८/१५६३

 

 

TOP