Home »News

स्मार्ट इ-कचरा व्यवस्थापन प्रणालीसाठी गोवा सज्ज

 

दि. १८ सप्टेंबर २०१८

     भाद्रपद २७,१९४०

 

गोव्यात निर्माण होणार्‍या इलेक्ट्रोनिक कचर्‍याच्या हाताळणीसाठी  लवकरच स्मार्ट आणि दर्जेदार इ-कचरा व्यवस्थापन प्रणालीची सुरवात करण्यात येणार असल्याची घोषणा गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने केली आहे. सदर घोषणा जीडब्ल्यूएमसी चे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रीगीस यांनी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ आणि त्यांच्या टॉक्सिक्स लिंक या अंमलबजावणी एजन्सीने मिरामार येथील हॉटेल वरांदा दो मार येथे ५ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित केलेल्या गोवा राज्यासाठी इ-कचरा व्यवस्थापन प्लान या प्रकल्पाच्या शुभारंभाच्या प्रसंगी केली. 

ऑनलाईन प्रणालीसह सुधारित जागरूकता, मजबूत आणि कार्यक्षम संग्रहण यंत्रणा यांची खरी गरज असल्याचे या प्रसंगी बोलताना संजीत रॉड्रीगीस यांनी सांगितले. आम्ही गोव्यात एक आदर्श प्रणाली घेऊन पुढे येत आहोत जी देशभर लागू होऊ शकेल असेही ते पुढे म्हणाले. अनौपचारिक क्षेत्रात निर्माण होणार्‍या धोकादायक स्वरूपाची प्रक्रीया असलेला इ-कचरा बंद करण्यावर त्यांनी भर दिला. जगभरात इ-कचरा हा सगळ्यात विषारी कचरा म्हणून मानला जातो. गोव्यात इलॅक्ट्रोनिक्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने इ- कचर्‍यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास राज्यासाठी ती एक मोठी डोकेदुखी ठरणार आहे. राज्यात शाश्वत इ-कचरा व्यवस्थापन प्रणाली स्थापन करणारा हा दोन वर्षांचा प्रकल्प टॉक्सिक्स लिंक अंमलात आणल. राज्यात या कचर्‍याचे प्रमाण पाहणे तसेच इ-कचरा गोळा करणे, साठवणे, सुरक्षित वाहतूक करणे आणि कचर्‍याची विल्हेवाट लावणे यावर एक प्रणाली तयार करण्याचेही काम टॉक्सिक्स लिंक करेल.

इ-कचरा निर्माण होण्याचे प्रकार आणि त्याच्या प्रमाणाच्या रूपरेषेचे सर्व्हेक्षण सुरू झाले असल्याचे यावेळी प्रकल्प टीमने सांगितले. या प्रकल्पाचे सर्वांनी कौतुक केले आणि राज्यातील इ-कचर्‍याच्या प्रश्नाला कायमस्वरूपी तोडगा मिळेल अशी आशाही व्यक्त केली.

या प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख भागधारकांसह सरकारी खाती, खाजगी कंपन्या, उद्योग संघटना आणि नागरी संस्थांचे पदाधिकारी  उपस्थित होते.

 

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/रापे/२०१८/१५५९

TOP