Home »News

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी डॉ. आंबेडकर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना

 

सामान्य वर्गातील(अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या व्यतिरिक्त) आर्थिकदृष्ट्या मागास वर्गीयांसाठी (ईबीसी) डॉ. आंबेडकर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीया केंद्र सरकार पुरस्कृत योजनेची समाजकल्याण खाते अंमलबजावणी करीत आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. १ लाखांपेक्षा कमी असलेल्या सामान्य वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयात मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी आर्थिक साहाय्य देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

इच्छुक विद्यार्थी आपले अर्ज आपल्या संबधित महाविद्यालयात देऊ शकतात आणि महाविद्यालय ते अर्ज संचालक, समाज कल्याण संचालनालय, पणजी येथे पाठविल.

अधिक माहितीसाठी अर्जदारांनी http://socialjustice.nic.in/post-matric.php या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा २२३२२५७ या क्रमांकावर संपर्क करावा.

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/रापे/२०१८/१५५८

TOP