Home »News

२९ रोजी गोधडी शिवण्याची कार्यशाळा

 

दि. १७ सप्टेंबर २०१८

भाद्र २६,१९४०

 

          वस्तूसंग्रहालय संचालनालयाच्या वतीने २९ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी. ९.३० ते संध्याकाळी ४.३० पर्यंत, राजीव गांधी कला मंदीर फोंडा येथे गोधडी शिवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत भाग घेण्यासाठी इच्छूक महिलांनी २४ सप्टेंबर २०१८ पूर्वी आपल्या नावाची नोंदणी करावी. 

महिलांनी त्यांच्या जुन्या साड्या तसेच सुई, दोरा, कातरी असे शिवण कामाचे इतर साहित्य आपल्या सोबत घेऊन यावे.  कार्यशाळेसाठी जागा मर्यादीत आहेत. उशिरा नोंद करणार्‍यांना कार्यशाळेत प्रवेश दिला जाणार नाही. नोंदणीसाठी इच्छूकांनी (०८३२)-२४३४४०६, २४३६००६ आणि ९४०३८४९८१६ यावर संपर्क करावा.                                                                          

मा/सप/टीएसएस/जॉआ/मागा/२०१८/१५४६

TOP