Home »News

बाबू कवळेकरांकडून गोवेकरांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

दि. १२ सप्टेंबर २०१८
भाद्रपद २१,१९४०

विरोधी पक्ष नेते श्री. चंद्रकांत(बाबू) कवळेकर यांनी १३ सप्टेंबर २०१८ रोजी होणार्याक गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोव्यातील समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीगणेश हा प्रारंभाची देवता असून तो सर्व विघ्नांचा विनाश करतो, सर्व अडथळ्यांवर मात करून आपल्या जीवनात सुख समृध्दी आणतो. म्हणून आपण कुठल्याही शुभकार्याची सुरूवात करण्यापूर्वी पहिल्यांदा श्री गणेशाची पूजा करतो. दुष्ट शक्तींचा नाश करून प्रेम, शांती आणि बंधूत्व नांदण्यासाठी प्रेरणा द्यावी अशी प्रार्थना ते श्री गणेशाजवळ करतात.
लोकांमध्ये मित्रत्वाची आणि एकतेची भावना निर्माण करून लोकांना एकत्र आणण्याचे महत्कार्य गणेश चतुर्थी सारखा उत्सव करतो. त्यामुळे लोक हा उत्सव मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने आणि आनंदाने साजरा करतात असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
फटाक्यांच्या प्रदुषणापासून लोकांनी स्वतःचे आणि आजूबाजूच्या वातावरणाचे रक्षण करावे असे आवाहनही श्री. कवळेकर यांनी केले.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्व भक्तांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद, येवो अशी सदिच्छाही त्यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना व्यक्त केली आहे.
मा/वाप/टीएसएस/रना/पांना/२०१८/१५४२

TOP