Home »News

मुख्यमंत्र्यांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

 

दि. १२ सप्टेंबर २०१८

        भाद्र २१,१९४०

 

          गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोव्यातील समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

          आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, श्री गणेश म्हणजे ज्ञानाचे आणि बुध्दीचे दैवत. गणेश चतुर्थी सणामुळे राज्यातील लोकांमध्ये एकता आणि सामाजिक सलोखा मजबूत होतो. यावर्षाचा हा सण गोव्यातील लोकांना सुखसमाधान, शांतता आणि भरभराट घेऊन येवो.

या शुभप्रसंगी, आपण आपला परिसर स्वच्छ, प्लास्टिक आणि प्रदूषणमुक्त करूया आणि पर्यावरणास अनुकूल असा गणेश चतुर्थी उत्सव साजरा करूया असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

मा/वाप/टीएसएस/रना/अगां/२०१८/१५४१

 

 

 

 

TOP