Home »News

आरोग्य मंत्र्याच्या हस्ते १८१ युनिवर्सल महिला हेल्पलाईनची सुरूवात

 

दि. १० सप्टेंबर २०१८

        भाद्र १९,१९४०

 

 

 

१०८ रूग्णवाहिका सेवेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कला अकादमी येथे आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात आरोग्य मंत्री श्री. विश्वजित राणे याच्या हस्ते १८१ युनिवर्सल महिला हेल्पलाईनची सुरूवात करण्यात आली.

यावेळी बोलताना, श्री राणे यांनी लोकांचे जीवन वाचविण्याचा हेतू ठेवून राज्यात २००८ पासून १०८ रूग्णवाहिका सेवेला सुरूवात केली होती असे सांगितले. राज्यातील हजारो लोकांचे जीवन वाचविण्याचे काम ही सेवा करेल. त्यांनी मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रिकर यांनी केलेल्या मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच या सेवेची सुरूवात काही मूलभूत सुविधांनी करण्यात आली होती पण आता त्यात आधुनिक जीव वाचविण्याच्या सुविधा, कार्डिएक केअर अशा अत्याधुनिक सेवेंची भर घातल्याचे सांगितले. दुचाकी रूग्णवाहिका सुरू केल्याचीही माहिती त्यांनी दिली.

श्री. राणे यांनी रूग्णाला पुढील उपचारासाठी इस्पितळात आणण्यापूर्वीची घेतलेल्या काळजी आणि योगदानाबद्दल जीव्हीके ईएमआरआयचे (आपत्कालिन व्यवस्थापन आणि संशोधन संस्था) अभिनंदन आणि कौतुक केले.

आरोग्य सचीव आएएस श्री. अशोक कुमार यांनी जीव्हीके ईएमआरआयद्वारे दिलेल्या सेवेचे कौतुक केले.  १०८ रूग्णवाहिकांची संख्या कित्येक पटीने वाढविण्यात आली आहे व जीव्हीकेद्वारे दिली जाणारी सेवा शहरातून गावापर्यंत पोहोचली आहे, असे त्यांनी सांगितले.

 

 

यावेळी, १०८ जीव्हीके ईएमआरआयचे कंत्राट आणखीन १० वर्षांनी वाढविण्यात आले.

जीव्हीके ईएमआरआयचे संचालक श्री. के. कृष्णम् राजू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

महिला आणि बाल विकास संचालनालयाचे संचालक श्री. दिपक देसाई यांनी गरजू आणि संकटात असणार्‍या प्रत्येक महिलेसाठी जीव्हीके ईएमआरआय अंतर्गत टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले. ज्यामुळे “गोवा राज्यात महिला सशक्तीकरण आणि अधिकारांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यात मदत होईल.” महिला आणि बाल विकास संचालनालयाद्वारे महिलांसाठी लाडली लक्ष्मी आणि गृह आधार अशा विविध योजना राबविल्या जातात, असे त्यांनी पुढे सांगितले.

गोवा विद्यापीठाच्या महिला अभ्यास विभागाच्या प्रा. शैला डिसोजा यांनी गरजू महिलांना मदत करण्यासाठी १८१ हेल्पलाईनची सुरूवात केली असून त्यात समुपदेशन, मार्गदर्शन, माहिती तसेच घरगुती हिंसा अशा विविध धोक्याच्या स्थितीत त्यांना मदत होईल असे सांगितले.

यावेळी १८१ हेल्पलाईन सेवेसाठी दोन गाड्या देण्यात आल्या. गोवा शिपयार्ड मार्फत देण्यात आलेल्या १०८ रूग्णवाहिकेची बावटा दाखवून सुरूवात केली.

यावेळी, आरोग्य मंत्र्यांचा विशेष अधिकारी डॉ. राजनंदा देसाई, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रदिप नाईक, महिला आणि बाल विकास संचालनालयाच्या संयुक्त संचालक श्रीमती दिपाली नाईक , जीव्हीके ईएमआरआय १०८ चे कर्मचारी, वरिष्ठ डॉक्टर्स आणि इतर सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी नम्रता वांयगणकर यांनी केले तर जीव्हीके ईएमआरआय १०८ सेवेची प्रमुख कुमारी पूर्ती पाटकर यांनी आभार मानले.

मा/वाप/टीएसएस/रना/अगां/मागा/२०१८/१५३७

TOP