Home »News

जुवारी पुलाला धोका नाही

ता. २८ ऑगस्ट २०१८

        भाद्र ६,१९४०

 

          जुवारी पुलावर कुठ्ठाळीच्या बाजूने फट (गॅप) दिसून आल्यामुळे पुलाला धोका असल्याच्या बातम्यांच्या बाबतीत आल्तिनो-पणजी येथील सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे कळविण्यात येते की दिसते ती फट विस्तार जोड फट आहे. ती ४० ते ५० एमएम आहे. ही फट पुलाच्या कमानीचा विस्तार किंवा लहान होण्याच्या प्रक्रियेस सोयीस्कर व्हावी म्हणून खुली ठेवली आहे. या फटीमधील लहानशा भागाचा काँक्रिटचा थर वाहनांच्या वाहतूकीमुळे उखडला, परंतु विस्तार जोडणीला कोणताच धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/२०१८/१४८३

 

 

 

TOP