Home »News

ग्रामपंचायत विकास आराखडा

ता. २८ ऑगस्ट २०१८

        भाद्र ६,१९४०

 

          गोवा सरकारतर्फे ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीए) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

          ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याकरिता सर्व ग्रामपंचायतींमध्ये लोकांचा सहभाग असावा म्हणून सरपंच, ग्राम विकास समिती संयोजक, महिला पंच सदस्य आणि ग्रामपंचायत सचिवांसाठी जीपीडीपीवर आधारित दिशानिर्देशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा उत्तर गोवा जिल्ह्यासाठी २९ ऑगस्ट २०१८ रोजी ताळगाव येथील ताळगाव कम्युनिटी सभागृहात आणि दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी ३० ऑगस्ट २०१८ रोजी मडगाव येथील माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलाच्या परिषदगृह, कक्ष क्र. ४०७ मध्ये होईल. गोवा सार्वजनिक प्रशासन व ग्रामविकास संस्थेतर्फे स. १०.३० वाजता ही कार्यशाळा घेण्यात येईल. गोव्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामविकास समिती संयोजक, महिला पंच सदस्य व ग्रामपंचायत सचिव या कार्यशाळेला उपस्थित असतील.

          जीपीडीपी नियोजन प्रक्रियेपूर्वी समावेशक उपक्रम राबविणे, लोकजागृती करणे, जीपीडीपीचे नियोजन करणे, ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी कृती आराखड्यावर चर्चा करणे यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

          एका चांगल्या व परिणामकारक जीपीडीपीसाठी समुदायाने त्याच्याशी जोडले जाण्याकरिता सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींनी या कार्यशाळेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन पंचायत संचालकांनी केले आहे.

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/२०१८/१४८१

 

 

 

 

TOP