Home »News

स्मार्ट सिटी अंतर्गत पणजी शहराचा कायापालट

ता. २८ ऑगस्ट २०१८

             भाद्र ६,१९४०

 

          भारत सरकारच्या नगर विकास मंत्रालयातर्फे २०१५ साली सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत फास्ट ट्रॅक मोड मध्ये निवडण्यात आलेल्या १३ शहरांमध्ये २०१६ साली पणजी शहराचा समावेश होता. तेव्हापासून स्मार्ट सिटी पणजीची झालेली प्रगती विलक्षण आहे, असे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ श्री. स्वयंदीप्त पाल चौधरी यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, स्मार्ट सिटी पणजी ही देशातील सर्वांत वेगाने झालेली स्मार्ट सिटीची अंमलबजावणी आहे. देशातील एक प्रमुख मॉडेल म्हणून आज पणजी शहराकडे पाहिले जाते.

          स्मार्ट सिटी पणजीला भारत सरकारतर्फे चांगल्या कामगिरीसाठी रिफॉर्म पुरस्कार आणि नाविन्यता व चांगल्या पध्दतीमधील सर्वोत्कृष्ट राजधानीसाठी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार यासारखे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याविषयी श्री. चौधरी विनम्रतेने सांगतात की पुरस्कार मिळविणे म्हणजे जनतेचे कौतुक करणे. जनतेच्या साहाय्याने स्मार्ट सिटीचे ध्येय आम्हाला साध्य करायचे आहे. तळापासून सुरू करून उच्च स्तरापर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. आणि या प्रक्रियेत जनतेने आम्हाला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे.

          इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास मर्यादितचे संचालक श्री. सिध्दार्थ कुंकळयेकर म्हणतात की आम्ही जनतेसोबत अनेक सल्लागार बैठकी घेतल्या आणि यापुढेही त्या तशाच सुरु राहतील.  लोकांच्या गरजेप्रमाणे आम्ही सेवा पुरविली पाहिजे. शहराच्या सर्वात कमकुवत घटकापासून सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. उदाहरणार्थ, विकलांगासहीत सर्वांना, सोयीचे असणारे समान पदपथ बांधण्याचा आमचा विचार आहे.”

          पणजीतील मुलभूत सुविधा सुधारण्यावरील भर टाळता येत नाही. नियोजित ध्येयांबद्दल श्री. कुंकळयेकर सांगतात, आम्हाला फक्त चांगल सार्वजनिक ठिकाणे नाही तर सामान्य माणसासाठी महत्वाच्या असणार्‍या गोष्टी पर्ण करायच्या आहेत. आम्हाला लोकांना पुरेसे पाणी, अखंड वीज पुरवायची आहे. आम्हाला हे शहर विशेषतः महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित बनवायचे आहे. आम्हाला कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावायची आहे. आम्हाला पणजी एक निरोगी शहर बनवायचे आहे, असे ते म्हणाले.

          श्री. चौधर हे मान्य करतात की मुलभत सुविधा नसल्यास शहर स्मार्ट बनू शकत नाही. तथापि, ते म्हणतात की स्मार्ट सिटीसाठी केल्या जाणार्‍या सर्व गोष्टींसाठी एक ठराविक प्रक्रिया पाळावी लागते. आम्हाला अनेकवेळा विचारण्यात येते की निचरा समस्येबाबतीत स्मार्ट सिटी काहीच का करत नाही. त्याबाबतीत आम्ही नक्कीच काहीतरी करु शकतो, पण त्याकरिता आदेश पाहिजे. भविष्यात जर सरकारतर्फे किंवा इतर कोणत्याही यंत्रणेतर्फे आम्हाला याबाबतीत काही आदेश आल्यास त्यावर काम करण्यास आम्ही तत्पर आहोत.

          स्मार्ट सिटी म्हणजे काय याबाबतीत असलेले गैरसमज श्री. चौधरी दूर करतात. दर्जेदार जवन, लोकांची जगण्याची पध्दत जीवनाचा दर्जा उंचावणे इ. स्मार्ट सिटीची संकल्पना आहे. स्मार्ट सिटी म्हणजे चांगल्या दर्जेदार जवनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे. उदा. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पणजीला ३१० एलपीसीडी (दर दिवशी दरडोई लिटर) एवढा पाणीपुरवठा होतो. हा राष्ट्रीय सरासरी असलेल्या १३५ पेक्षा खप उंचावलेला आहे. यावरुन समजते की पणजीत पाण्याची कमतरता नाही. पण तरीही काही लोक टँकरचा वापर करतात. म्हणजेच येथे वितरणाची समस्या आहे. पाण्याच्या कमतरतेची समस्या नाही तर जेथे गरज आहे तेथे योग्य जागी पाणी मिळत नाही. याठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करुन सार्वजनिक बाधकाम खाते पाण्याची गळती शोधून काढू शकते. अशा प्रकारे स्मार्ट सिटीत स्मार्ट घटकांचा समावेश होतो. ’’

          स्मार्ट सिटी पणजीचा एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे वारसा संवर्धन. श्री. चौधरी म्हणतात की देशातील तर ठिकाणांशी पणजी शहराची तुलना होऊ शकत नाही आणि निसर्गाचे सौंदर्य व त्यात करावा लागणारा हस्तक्षेप याबाबतीत गोव्याची राजधानी खप वेगळी आहे.

          श्री. चौधरी विस्ताराने सांगतात, स्मार्टनेसची आमची संकल्पना म्हणजे काँक्रिटच्या इमारतींमध्ये किंवा बांधकामांमध्ये शिरकाव करणे नाही तर जुन्याचे जतन करणे जेणेकरुन आम्हाला आमचा इतिहास समजेल, आम्ही कोठून आलो ते समजेल व नंतर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक वातावरणात जायला मदत होईल. गोव्याचा मूळ वारसा जपणे फार महत्त्वाचे आहे.

          स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत केलेल्या कार्यांची माहिती देताना कुंकळ्येकर यांनी आझाद मैदानाचे नूतनीकरण करण्यात आल्याचे सांगितले. मळा संवर्धन प्रकल्पांतर्गत या क्षेत्रातील अंतर्गत लेनचेही काम करण्यात आले. या भागातील घरे एकमेकाला लागून असल्याने अनेक कामे भूमिगत पध्दतीने करण्यात आली. आम्ही पदपथ बांधले, सदर भागात रोषणाई केली, बाक उभारले आणि वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मळा पूलाचे बांधकाम पूर्ण केले.

          गोव्यातील प्रतिभावानांच्या क्षमतेचा वापर करणे हे स्मार्ट सिटी पणजीचे एक यश आहे. श्री. चौधरी यांनी सांगितले की, तांत्रिक गरजेच्या वेळीच आम्ही सल्लागारांची मदत घेतो. तथापि, स्थानिक प्रतिभावानांना आम्ही संधी देत असून, त्यांना प्रशिक्षण मिळते व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग गोव्यासाठीच होतो. सर्व कार्ये राज्यातच करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

          शहरातील वाहतूक नियंत्रित करणे हा स्मार्ट सिटी मिशनचा महत्त्वाचा भाग आहे. श्री. चौधरी म्हणतात की पणजी शहराचे नैसर्गिक सौंदर्य टिकविणे ही स्मार्ट सिटीची संकल्पना आहे. सर्वसमावेशक आराखड्याद्वारे अनेक गोष्टी साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरात पुरेशा प्रमाणात पार्किंग साठी आपल्याला जागा असेल आणि शहरात येणार्‍या वाहनांच्या संख्येत घट होईल. कार पार्क उभारणे हा उपाय नाही. खाजगी वाहने न वापरता सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे.

          पुढे ते म्हणतात, इको फ्रेंडली बसेस शहराच्या अंतर्गत भागात आणण्याचा आमचा विचार आहे, ज्यामुळे ठराविक कमी वेळेत लोक आपल्या नियोजित ठिकाणी पोहचू शकतील.

          कुंकळयेकर पुढे म्हणतात अमृत मिशन अंतर्गत पदपथ बांधण्यात आले व आल्तिनोकडे जाणार्‍या पायर्‍यांचेही नूतनीकरण करण्यात आले. तसेच कांपाल येथील नदीकिनारी व मांडवी नदीकिनारी पादचारी पुल उभारण्यात आले. चालण्यासाठी व सायकल चालविण्यासाठीही वेगळा पथ बांधण्यात येत आहे.

          मॅनग्रोव्ह्ज बोर्डवॉक या उपक्रमाला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. श्री. चौधरी म्हणतात स्मार्ट सिटीत प्रवेश केल्यावर आपण स्मार्ट सिटीत आहोत असे वाटले पाहिजे. पणजी शहराने स्मार्ट सिटी म्हणून केलेला विकास विलक्षण आहे. आम्ही योग्य मार्गावर आहोत आणि लोकांना त्याचे फायदेही मिळत आहेत.”

          स्मार्ट सिटी पणजी असे म्हटले तरी त्याचा फायदा पणजीच्या परिसरातील उप नगरांनाही होत आहे. उदाहरणार्थ रायबंदर येथील विजेची समस्या भूमीगत वीज वाहिन्या घालून सोडविण्यात येतील. त्याशिवाय इतर प्रकल्पांची कामे चालू आहेत.

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/२०१८/१४८०

TOP