Home »News

भारतीय शास्त्रीय नृत्यासंदर्भात नृत्य व्याख्यान सादरीकरण मालिका

ता. २८ ऑगस्ट २०१८

        भाद्र ६,१९४०

 

          गोवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयातर्फे नवी दिल्ली येथील भारत आंतरराष्ट्रीय ग्रामीण सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने गोव्यातील २४ शाळांमध्ये भारतीय शास्त्रीय नृत्यासंदर्भात नृत्य व्याख्यान सादरीकरण मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ८ सप्टेंबर दरम्यान होणार्‍या या उपक्रमात पुणे येथील कथ्थक नृत्यांगना श्रीमती अमर्त्या चटर्जी (घोष) आणि बंगलुरू येथील भरतनाट्यम् नृत्यांगना श्रीमती रेवती श्रीनिवासराघवन्  यांची उत्तर गोव्यात व दक्षिण गोव्यात नृत्य व्याख्याने होतील. शिक्षणातील सांस्कृतिक मूल्ये अधिक मजबूत करणे आणि नृत्य व संगीत या भारतीय सांस्कृतिक वारशासंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.

          श्रीमती अमर्त्या  चटर्जी (घोष) यांच्याकडे कथ्थक नृत्यातील पदविका असून पत्रकारिता व मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले आहे. त्यांनी पं. संतोष कुमार चटर्जी, श्रीमती मधुमिता राय, पद्मविभूषण पं. बिर्जु महाराज व शाश्वती सेन यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी भारतात तसेच भारताबाहेर कथ्थकचे कार्यक्रम केले आहेत.

          श्रीमती अमर्त्या चटर्जी (घोष) व त्यांचे सहकारी ते सप्टेंबर दरम्यान उत्तर गोव्यातील १२ शाळांमध्ये नृत्य व्याख्यान सादरीकरण करतील. त्यात धारगळ-पेडणे येथील लोकशिक्षण हायस्कूल, हळर्ण-पेडणे येथील हळर्ण पंचक्रोशी हायस्कूल, म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिर, शिवोली-बार्देश येथील कीर्ती विद्यालय, आमोणा-डिचोली येथील सरकारी विद्यालय, कुडणे-साखळी डिचोली येथील महालक्ष्मी हायस्कूल, वाळपई येथील अवर लेडी ऑफ लूर्डस् हायस्कूल, वाळपई येथील युनिटी हायस्कूल,, शिरोडा येथील श्री कामाक्षी हायस्कूल, तळावली-फोंडा येथील श्री महालक्ष्मी इंग्लिश हायस्कूल, पणजी येथील पीपल्स हायस्कूल आणि कात्येभाट एला-ओल्ड गोवा येथील ओल्ड गोवा एज्युकेशनल इन्स्टिट्युट या शाळांचा समावेश आहे.   

          श्रीमती रेवती श्रीनिवासराघवन् यांनी सुरूवातीचे शिक्षण स्व. गुरू कोमालवल्ली कृष्णमणी यांच्याकडून घेतले व त्यानंतर पद्मभूषण श्रीमती कलानिधी नारायणन्, एस. पी. श्रीनिवासन् व टी. एस. नंदकुमार यांच्याकडून शिक्षण घेतले. सध्या त्या श्री. सतीश कृष्णमूर्ती यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी ललित कलेमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या नृत्य अलंकार पदवीधारक आहेत. त्यांनी विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळांमध्ये भाग घेतला असून अनेक शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली आहेत. तसेच भारतात व विदेशात त्यांचे कार्यक्रमही झाले आहेत.   

          श्रीमती रेवती श्रीनिवासराघवन् व त्यांचे सहकारी ते सप्टेंबर दरम्यान दक्षिण गोव्यातील १२ शाळांमध्ये नृत्य व्याख्यान सादरीकरण करतील. त्यात रिवण-सांगे येथील अवर लेडी ऑफ फातिमा हायस्कूल, नेत्रावळी-सांगे येथील सरकारी विद्यालय, पिळये-धारबांदोडा येथील गोमंतक विद्यालय, तामसोडा-धारबांदोडा येथील मातोश्री आनंदीबाई वामन मराठे विद्यालय, फातोर्डा येथील प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट हायस्कूल, मडगाव येथील भाटीकर मॉडेल हायस्कूल, आगोंदा येथील सरकारी विद्यालय, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालय हायस्कूल, शिरवई-केपे येथील लोकविश्वास प्रतिष्ठान हायस्कूल, बाळ्ळी-केपे येथील विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय, वास्को येथील अवर लेडी ऑफ कॅन्डेलेरिया हायस्कूल आणि वास्को येथील म्युनिसीपल हायस्कूल यांचा समावेश आहे.

 

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/२०१८/१४७९

 

 

TOP