Home »News

केरळ मदत निधीला मदत करण्याचे आवाहन

ता. २७ ऑगस्ट २०१८

        भाद्र ५,१९४०

 

       केरळात आलेल्या पुरामुळे तेथील जनजीवन उध्वस्त झाले असून तेथील मालमत्ता, रस्ते इ. ची हानी झाली आहे.

       ही मानवी शोकांतिका असून या संकटाच्या काळात गोमंतकीयांनी तेथील आपल्या बंधूंना मदतीचा हात दिला पाहिजे. त्यामुळे गोवा सरकारने “CHIEF MINISTER OF GOA, KERALA RELIEF FUND” ( ३७८९६४६४०५०) या नावाने खाते उघडले आहे.

       केरळ मदत निधीला उदारपणे मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मदतीची रक्कम भारतय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोख, चेक, ईसीएस, एनईएफटी, आरटीजीएस इ. च्या माध्यमातून भरता येते.

       केरळ मदत निधीची विस्तृत माहिती – खात्याचे नाव - Chief Minister Of Goa, Kerala Relief Fund, खाते क्र. – ३७८९६४६४०५०, बँकेचे नाव – भारतीय स्टेट बँक, शाखा – पणजी सचिवालय, आयएफएससी कोड – SBIN०००५५५४, एमआयसीआर कोड –४०३००२००६ अशी  आहे.  

  

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/२०१८/१४७७

 

TOP