Home »News

पीकांचे उत्पादन वाढविण्यात मधमाशांची शेती उपयोगी : रघुनाथ मोरजकर (विभागीय कृषी अधिकारी - सांगे)

ता. 24 ऑगस्ट २०१८

        भाद्र 2,१९४०

          कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (एटीएमए), दक्षिण गोवा आणि सांगे येथील विभागीय कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जून 2017 व मार्च 2018 मध्ये सांगे तालुक्यातील नेत्रावळी येथे आणि ऑगस्ट 2018 मध्ये रिवण येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या रोजच्या जीवनातील मधमाशांच्या शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

          नेत्रावळी येथे जून 2017 मध्ये झालेल्या पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमात दक्षिण गोव्याच्या विविध भागांतील 72 शेतकर्‍यांनी भाग घेतला. यावेळी श्री. दिनेश प्रयाग, श्री. पी. शालीयो व सहाय्यक कृषी अधिकारी कु. गौरी प्रभुदेसाई यांनी मधमाशांच्या शेतीच्या महत्त्वाविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. गोमंतकीय शेतकरी हे सामान्यत: नारळ, सुपारी, भाज्या व भात या पारंपरिक पीकांची शेती करतात. मधमाशांची शेती हे आपल्या देशातील मध मिळविण्यासाठीचे पुरातन कृषी तंत्रज्ञान आहे आणि मध हा आपला एक महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे. आरोग्यासाठीच्या वैद्यकीय लाभांमुळे तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रसिध्द ठरतो आहे. या प्रक्रियेत शेतकर्‍यांना फायदा होतोच, पण त्याचबरोबर मधमाशांची शेती कृषी उत्पादन वाढविण्यातही हातभार लावते, असे सांगे येथील विभागीय कृषी अधिकारी श्री. रघुनाथ मोरजकर यांनी यावेळी सांगितले.

          या प्राथमिक टप्प्यानंतर, 18 प्रशिक्षित शेतकरी व दक्षिण गोव्यातील एटीएमएचे अधिकारी यांच्या समुहाने कर्नाटक राज्यातील होन्नावर येथील हनी बी सोसायटीला भेट दिली. सोसायटीचे सचिव श्री. हेगडे यांनी सोसायटीचे कामकाज, बी बॉक्स, बॉक्सची देखरेख, मध काढणे, मधमाशांचे पोळे इ. बद्दल माहिती दिली. यावेळी समुहाने गेली 25 वर्षे मधमाशांची शेती करणार्‍या होन्नावर येथील दोन प्रगतशील शेतकर्‍यांनाही भेट दिली. या उपक्रमातून समुहाला मधमाशांच्या शेतीबद्दल उपयुक्त माहिती मिळाली.

          या भेटी नंतर होन्नावर येथून आणलेले 22 आठ फ्रेमचे बी बॉक्स आणि आठ फ्रेमचे मधमाशांचे पोळे रिवण, कोळंब, नेत्रावळी व सावर्डे येथील शेतकर्‍यांना सांगेचे विभागीय कृषी अधिकारी श्री. रघुनाथ मोरजकर यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले. गट तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. सोहम घाटे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. जानू वरक व श्री. संकेश गांवकर हे एटीएमए दक्षिण गोवाचे प्रकल्प उप-संचालक श्री. दत्तप्रसाद देसाई, सहाय्यक कृषी अधिकारी कु. गौरी प्रभू देसाई, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. नितिन बोरकर व सहाय्यक कृषी अधिकारी कु. मिलन गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांना मधमाशांच्या पोळ्यांची देखभाल करण्यात मदत करत आहेत.

          मार्च महिन्यात याच समुहासाठी वयाच्या 14 व्या वर्षापासून मधमाशांची शेती करत असलेल्या  कर्नाटक येथील शेतकरी श्री. मुमताज अली यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले. अली यांनी प्रात्यक्षिकांद्वारे मधमाशांचे आयुष्य, कीटक ्यवस्थापन आणि बॉक्सची देखरेख याबाबतीत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या शेताला भेट देऊन मधमाशांचे पोळे, त्यांची कार्यपध्दती व पावसाळ्यातील त्यांची देखरेख याविषयी सल्ला दिला.

          गेल्या 5 महिन्याशेतकर्‍यांच्या मधमाशांच्या पोळ्यांमधून सुमारे 3 किलो मध गोळा करण्यात आला. तसेच या शेतातील इतर पिकांचे उत्पादन 25% वाढल्याचे दिसून आले कारण मधमाशा या पुनरूत्पादनाची महत्वाची भमिका बजावतात.

          मधमाशांची शेती करण्यासाठी सप्टेंबर उत्कृष्ट महिना असल्याने विभागीय कृषी कार्यालय सांगे आणि एटीएमए दक्षिण विभाग यांच्यातर्फे शेतकर्‍याठी नेत्रावळी येथ १० ऑगस्ट २०१८ रोजी प्रशिक्षण कार्यक्रम आयित करण्यात आला. यावेळी ४० शेतकर्‍यांनी भाग घेतला व त्यांना विभागीय कृषी अधिकारी श्री. रघुनाथ मोरजकर व श्री. मुमताज अली यांनी मार्गदर्शन केले.

          यावेळी विभागीय कृषी अधिकारी श्री. रघुनाथ मोरजकर यांनी सांगितले की प्रत्येक शेतकर्‍याने ममाशांची शेती हा एक छंद म्हणून जोपासला पाहिजे. शेतकरी आणि तंत्रज्ञान याच्यामधील दरी कमी करण्यासाठी विभागीय कृषी कार्यालय सांगे आणि एटीएमए दक्षिण विभाग यांच्यातर्फे प्रशिक्षण देण्यात येईल. गरजेच्या वेळी शेतकर्‍यांना मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत असे ते म्हणाले.

          सांगे तालुक्यात सध्या २३ शेतकरी मधमाशांची शेती करहेत णि ३२ शेतकर्‍यांनी नोंदणी करुन त्यात आपली आवड दाखविली आहे. तरु शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय कृषी कार्यालय सांगे आणि एटीएमए दक्षिण विभाग कार्यरत आहेत.

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/2018/1469

 

TOP