Home »News

राष्ट्रीय युवा पुरस्कार

पणजी, ऑगस्ट २३, २०१८

 भाद्र १,१९४०

 

          क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे  २०१६-१७ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी युवा विकास क्षेत्रात प्रशंसनीय सेवा दिलेल्या कार्यरत व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय विकास आणि आरोग्य, संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रम, संस्कृती, मानवी हक्कांचा प्रसार, कला व साहित्य, पर्यटन, पारंपरिक औषधे, सक्रीय नागरिक, सामुदायिक सेवा, क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता आणि अद्ययावत शिक्षण या क्षेत्रातील समाजसेवा.

          वैयक्तिक पुरस्कारासाठी १५ ते २९ या वयोगटातील युवा अर्ज करण्या पात्र आहेत.

          पात्रतेसाठीचे इतर संबंधित नियम व अटी, अर्ज नमुने www.dsya.goa.gov.in या क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक युवकांनी तो डाऊनलोड करावा किंवा कांपाल – पणजी येथील क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या युवा विभागाच्या एपीईओ श्रीमती लिसेट कमारा यांच्याकडून सप्टेंबर २०१८ पूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अर्जाचा नमुना मिळवावा.

          पात्र युवा/स्वयंसेवी संस्थानी प्रमाणपत्रांसहित पूर्णपणे भरलेला अर्ज कांपाल – पणजी येथील क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या कार्यालयात सप्टेंबर २०१८ पूर्वी सादर करावा.

          सप्टेंबर २०१८ नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.  

 

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/२०१८/1465

 

TOP