Home »News

जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

                                                                                      १५ मार्च २०१९

 २३ फाल्गून १९४०

 

        पाटो पणजी येथील कला व संस्कृती संचालनालयाच्या, संस्कृती भवनातील, बहुउद्देशीय सभागृहामध्ये आज जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.

        हा समारंभ नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. ट्रस्टेड स्मार्ट प्रॉडक्टस्(विश्वसनिय स्मार्ट उत्पादने) हा यावर्षीच्या जागतिक ग्राहक हक्क दिनाचा विषय आहे.

         ग्राहक व्यवहार समिती (जीसीसीई) चे चेअरमन श्री. गंगाराम मोरजकर, व्ही.एम्. साळगांवकर कायदा महाविद्यालयाच्या कन्झ्युमर क्लिनिकचे संचालक डॉ. शबीर अली, श्री. रोलंड मार्टीन्स, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याच्या संचालीका श्रीमती संध्या  कामत आणि सहायक संचालीका श्रीमती विरा नायक हे यावेळी उपस्थित होते.

         यावेळी आपल्या बिजभाषणात डॉ. शबीर अली म्हणाले की, स्मार्ट तंत्रज्ञानाच्या उदयामुळे ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात स्मार्ट तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशनचेही सादरीकरण केले.

         सुरुवातीला श्रीमती संध्या कामत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. श्रीमती अमिता सलत्री यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी श्रीमती विरा नायक यांनी आभार प्रदर्शन केले.

         नंतर झालेल्या चर्चासत्रात अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय, वजन आणि माप खाते, भारतीय मानक ब्युरो आणि एलपीजी ग्राहक व्यवहार यांच्या अधिकार्‍यांनी भाग घेतला.

 

मा/वाप/एनएन /जॉआ/पांना/२०१९/ ४४

TOP