Home »News

वीज तारांबाबत इशारा

फेब्रुवारी ०८,२०१९

माघ १९, १९४०

 

औद्योगिक वसाहत, कोकोडा, कुडचडे (मे. तिंबलो मायनिंग आणि इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड) येथे नवीन उभारण्यात आलेली ४० मीटर लांबीची ११ केव्ही एकेरी वीजवाहिनी आणि ४०० केव्हीए डीटीसी आणि संलग्न विजयंत्रणा, ०८ फेब्रुवारी २०१९ रोजी विद्युतभारीत होणार असून यापुढे ती तशीच भारीत राहील.

लोकांनी आपली गुरे या खांबांना, केबलला न बांधण्याचा सल्ला देण्यात आला आहे तसेच लोकांनी सुरक्षा कारणास्तव या यंत्रसामुग्रीपासून दूर राहावे.

 

मा/वाप/एनएन/जॉआ/अगां/२०१९/५३

 

 

TOP