Home »News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर वेशभूषा व प्रश्नमंजूषा स्पर्धा

फेब्रुवारी ०८,२०१९

माघ १९, १९४०

 

माहिती आणि प्रसिध्दी खात्यातर्फे बांदोडा ग्रामपंचायत आणि बांदोडा जिल्हा पंचायत यांच्या सहकार्याने १९ फेब्रुवारी २०१९ रोजी फर्मागुडी फोंडा येथे, राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या सोहळ्यानिमित्त, १९ फेब्रुवारी २०१९ रोजी फर्मागुडी येथील श्री गणपती देवस्थानच्या प्रांगणात दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात शालेय स्तर व उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता ५ वी ते १० वी आणि इयत्ता ११ वी ते १२ वी) अशा दोन गटांमध्ये सकाळी ९.०० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संवादासहीत वेशभूषा स्पर्धा होईल. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व काळ (१६२७ ते १६८०) या विषयावर अखिल गोवा महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येईल, ज्यात शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर भर देण्यात येईल.

 

प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना, त्यांच्या विद्यार्थ्यांना उपरोक्त स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. इच्छुक सहभागकर्त्यांनी अधिक माहितीसाठी माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे श्री. श्याम गांवकर यांच्या मोबाईल क्र. ९४२२४४४६२४ वर संपर्क साधावा.

         

मा/वाप/एनएन/जॉआ//अगां/२०१९/५२

TOP