Home »News

राज्यपालांच्या उपस्थितीत नाणूस वाळपई येथे सप्तगोमाता मंदिराचे उद्घाटन

फेब्रुवारी ०७,२०१९

माघ १८, १९४०

         

राज्यपाल डॉ. श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या हस्ते गोवा विधानसभेचे सभापती      डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत नाणूस, वाळपई - सत्तरी येथील गोवर्धन केंद्रात सप्तगोमाता मंदिर उद्घाटन आणि गोपालकृष्ण मूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात पारंपारिक धार्मिक विधीनुसार मंदिराचे उद्घाटन व गोपलमूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवानंद खेडेकर, केंद्राचे अध्यक्ष श्री. हनुमंत परब व व्यवस्थापक श्री. रामचंद्र जोशी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल डॉ. श्रीमती मृदुला सिन्हा यांनी गोसेवेसारखे दुसरे पुण्य नसल्याचे सांगून सत्तरी सारख्या ग्रामीण भागात गोशाळा स्थापन करून गोसेवेचे सक्रीय काम करणार्‍या गोभक्तांचे अभिनंदन केले.

निसर्गाने चोहोबाजूंनी वेढलेल्या नाणूस गावातील गोवर्धन सेवा केंद्रात स्थापन करण्यात आलेली गोपालमूर्ती याठिकाणी धार्मिकतेचे प्रतिक असून सर्व धर्माचे लोक याठिकणी कार्य करत असल्याने  मन प्रसन्न होत असल्याचे राज्यपाल म्हणाल्या.

गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोसेवेमुळे मनशांती आणि तनशांती प्राप्त होते. कृषीसंस्कृती आणि ऋषीसंस्कृती खूप महत्वाची असून ती टिकली तरच आपला देश टिकेल. गोसेवेचे महत्त्व तळागाळातील लोकांपर्यत पोहचविण्याची आज खरी गरज आहे असेही डॉ. सावंत पुढे म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी कृषीमंत्री श्री. रमेश तवडकर, डॉ. प्रमोद सावंत, माजी उपसभापती श्री. नरहरी हळदणकर, शिवानंद खेडेकर, एकनाथ चाकूरकर,     आर.एन. भोबे, कमलाकांत तारी, स्वाती शिलकर, सविनय दामले, के.डी.साधले,   शांताबाई मणेरकर, नाथभाई पुरोहित, अमर बोराना, अमृतसिंह, कमलेश बांदेकर,    उर्मिला बेहरे, सुनिल शिरोडकर, संजिवनी मणेरीकर, रामचंद्र गांवस,                          डॉ. वल्लभ धायमोडकर, मंगला देसाई, शेखर बेतकीकर, बया काळे, प्रकाश नाईक, उमाशंकर, विश्वकर्मा, इद्रूस शेख, आनंद गांवकर, तातोबा पाटील, पुष्पराज नावेलकर, आनंद मयेकर व पुंडलिक भूते आदींचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

सुरूवातीला गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष श्री. हनुमंत परब यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. श्री. विवेक जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर लक्ष्मण जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मा/वाप/एनएन/जॉआ/श्याम/अगां/२०१९/४९

TOP